ब्रेकिंग न्यूज :
भारत

अरे देवा ! रमाई, शबरी योजनेच्या कामातही लाच !

Blog Image
एकूण दृश्ये: 149

अरे देवा ! रमाई, शबरी योजनेच्या कामातही लाच ! पत सांभाळू शकला नाही तलाठी ? मागीतले तीस, घेतले पंचवीस ; मग काय ! लाचलुचपत लागले पाठी; बेडीत अडकला तलाठी 

       संगमनेर { भारत रेघाटे }

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत रमाई, शबरी आवासासाठी मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार मोफत वाळू वाटप सुरू करण्यात आलेली असताना मला पैसे न दिल्यास तुम्ही अवैद्यरीत्या वाळू नेत असल्याची धमकी देतो तीस हजाराची मागणी करणाऱ्या तलाठ्यास अहिल्यानगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत संगमनेर बस स्थानका समोरच रंगेहात पकडल्याच्या घटनेने शहरासह तालुक्यात आणि महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून या कारवाईने अनेकांचे धाबे मात्र चांगलेच दणाणल्याचे दिसून येत आहे.

     याबाबत सविस्तर वृत्त असे की, संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागात पंतप्रधान योजने अंतर्गत रमाई ,शबरी घरकुल योजना राबवली जात आहे. सदर योजनेसाठी शासन स्तरावरून महसूल विभागा मार्फत पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा प्रस्ताव तहसीलदाराकडून धीरज मांजरे यांच्याकडून मंजूर करण्यात आला आहे. घरकूल बांधकामास परवानाधारक वाळू वाहतूकदारास परवानगी दिल्यानंतरही कनोली येथील तलाठी आप्पा संतोष बाळासाहेब शेलार (वय वर्ष 40 -वर्ग 3) याने वाळू वाहतूकदारास 30 हजाराची मागणी केली. पैशाची मागणी पूर्ण न केल्यास अवैध वाळू उपसा केल्याचा ठपकाच लावेल अशी धमकी दिल्याने सदर वाहतूकदराने 25,000 रुपये देतो असे सांगत तडजोड करण्याची विनंती केली.सदर रक्कम घ घेण्यास आप्पा महाशय तयार झाले.

एका तक्रारदाराने अहिल्यानगर लाचलुचपत विभागास तलाठी संतोष शेलार यांच्या विरोधात तक्रार दाखल करताच अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संगमनेर बस स्थानका समोरच जाल टाकत तलाठ्यास पंचवीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सदर वाळू वाटप करण्यासाठी पंचायत पातळीवर वाळू वाहतुकीसाठी त्याचे मित्र आणि इतर वाहने यांना तहसीलदार यांनी मंजुरी पण दिली होती. तक्रारदार त्याचे मित्र हे त्याच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करण्याचे काम करीत असताना तुम्हाला वाळू वाहतूक करायची असेल तर मला तीस हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्या अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याबाबत कारवाई करेल असा सज्जड दम तलाठ्याने या वाळू वाहतूक दाराला भरला. सोमवार दि. 7/7/ 2025 ला तडजोडी अंती 25 हजाराची रक्कम मागणी घेण्याचे तलाठी आप्पाने कबूल करताच केली आहे.

----- Advertisements -----

तलाठ्याच्या विरोधात अहिल्यानगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तसेच पंचायत समक्ष बस स्थानकासमोर पंचवीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात आढळून आल्याने या ठगा विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच 7 - 7 -25 या तिथीला अतिथीगृहात खरपूस समाचाराची इत्यंभूत माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेत तलाठी आप्पाची असून चौकशी केल्या अनेकांचे धाबे दणाणले  आहे. .या कारवाईत अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक तपास अधिकारी पोलीस निरीक्षक छाया देवरे, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिकूटे यांनी सापळा रचत पथकातील हरून शेख, चंद्रकांत काळे, गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक यांनी सदर तलाठ्यास रंगेहात पकडले. पुढील तपास  अधिकारी पोलीस निरीक्षक छाया देवरे ह्या करीत असून या तपासात महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच हितसंबंधी यांची देखील कसून चौकशी होणार असल्याने अनेकाचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे दिसून येत आहे.

संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराज