ब्रेकिंग न्यूज :
भारत

अनंत चतुर्दशीला पठार हादरले ; दोन अल्पवयीन बहिणींचा जीवन प्रवास संपला ;

Blog Image
एकूण दृश्ये: 270

अनंत चतुर्दशीला पठार हादरले ; दोन अल्पवयीन बहिणींचा जीवन प्रवास संपला ; 

   संगमनेर : प्रतिनिधी

------- तालुक्यातील साकूर पठार परिसरातून धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली असून ,अनंत चतुर्दशीच्या दिवशी या दुर्दैवी घटनेत दोन अल्पवयीन मुलींनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे?  वृत्त वाऱ्यासारखे बाहेर पडताच क्षणार्धात संगमनेर तालुक्यातील पठार भागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या घटना आत्महत्या ? आहे की अजून काय घडले अद्याप स्पष्ट झालेले नाही. घडलेल्या या दुर्दैवी घटनेमध्ये तरुणींची नावे. मानसी राजेंद्र सगळगिळे १५ तन्वी अजित सगळगिळे १७, आहेत. मानसी ही इयत्ता नववीत शिकत होती.

----- Advertisements -----

तालुक्यातील साकूर शिवारातील बनवस्ती येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशीच हृदय हेलावणारी घटना घडली आहे. सख्ख्या चुलत बहिणींनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ? केल्याने संपूर्ण पठार भागासह संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. नेहमी प्रमाणे शनिवारी सकाळी सगळगिळे कुटुंब शेतात कामाला गेले होते. तन्वी व मानसी घरीच होत्या. मात्र दुपारी चारनंतर तन्वीने एका घरात व मानसीने दुसऱ्या घरात गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी मानसीला तातडीने ग्रामीण रुग्णालय, साकूर येथे दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले.

मात्र दोन्ही अल्पवयीन सख्या चुलत बहिणींनी बाबत असा प्रसंगा का घडला ? का त्यांनी टोकाचे पाऊल उचलले ? तद्वदतच हा प्रकार नेमका कशाने घडला याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे या दोघींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट असून. घारगाव पोलिसांशी संपर्क केला असता तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे.

या घटनेमधील एका मुलीचे वडील बाहेरगावी असल्याने तसेच आज  रविवार दि. 8  ला दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतरच अहवालातून घटनेचे कारण स्पष्ट होईल.

श्रमाशिवाय फळ मिळत नाही.

लोकमान्य टिळक
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin