अमली पदार्थांच्या तस्करीमागे हप्तेखोरी’चा खेळ ! बाळासाहेब थोरातांचा स्फोट
संगमनेर ( भारत रेघाटे )
हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून संगमनेरमध्ये काळे धंदे सुरू आहेत असा जळजळीत आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर बोलताना थोरात म्हणाले, चाळीस वर्ष हा तालुका परिवारासारखा सांभाळला पण आता बाहेरून आलेल्या काहींच्या हिंदुत्वाच्या नावाखाली ड्रग्स, अमली पदार्थ, इंजेक्शन आणि लिक्विडचा काळा व्यवसाय सुरू आहे.

थोरातांचा हल्लाबोल
या धंद्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे ? कोण संरक्षण देतो आहे ? असा खडा सवाल करत हल्लाबोल केला. ते म्हणाले की, हप्तेखोरी हेच अमली पदार्थांच्या वाढीमागचं एकमेव कारण आहे. धर्माच्या नावावर दादागिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. असा थोरातांनी संत परंपरेचा आणि वारकरी संप्रदायाचा दाखला देत स्पष्ट इशाराच दिला.
संगमनेरमध्ये दहशतीचे फलक झळकवणाऱ्यांना वेळ आल्यास संगमनेरची ताकद दाखवून देवू. अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीवरून त्यांनी चिंता व्यक्त करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि तरुणांनी चुकीच्या प्रवाहात न वाहण्याचे आवाहन त्यांनी केले
