ब्रेकिंग न्यूज :
भारत

अल्पवयीनवर अत्याचार ; गुन्हा दाखल ; आरोपी फरार

Blog Image
एकूण दृश्ये: 131

अल्पवयीनवर अत्याचार ; गुन्हा दाखल ; आरोपी फरार

    संगमनेर 

तालुक्यात काळीमा फासणारी एक घटना समोर आली असून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत दोनदा बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी आदित्य अर्जुन शेटेच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, सदर पीडित मुलगी एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दरम्यान तिची ओळख आरोपी शेटे सोबत झाली. आरोपीने तिच्या सोबत प्रेमसंबंध स्थापित करत लग्नाचे आमिष दाखवून पिडीत मुलीला स्वतःच्या घरी बोलावले. ५ डिसेंबर २०२४ ते १५ एप्रिल २०२५ या कालावधीत आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केला.

या घटनेची माहिती मुलीच्या पालकांना समजल्यानंतर, तिने आरोपी सोबत लग्नाचे नियोजन करत असल्याचे सांगितले. ३ जून २०२५ रोजी आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून,लग्न करण्यास भाग पाडल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. पीडित मुलीने तात्काळ तालुका पोलिसांत तक्रार दाखल केली असून

तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी आदित्य अर्जुन शेटेच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत बलात्काराचा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) अंतर्गत 64,65 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी हा फरार झाला असून तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत.

----- Advertisements -----

कठीण काळातही आत्मविश्वास ठेवा.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin