ब्रेकिंग न्यूज :
भारत

अभिष्टचिंतन सोहळ्यात "बी आर" आत्मचरित्र होणार प्रकाशित समारंभास आपणही राहावे उपस्थित

Blog Image
एकूण दृश्ये: 186

अभिष्टचिंतन सोहळ्यात "बी आर" आत्मचरित्र होणार प्रकाशित ; समारंभास आपणही राहावे उपस्थित 

      संगमनेर : भारत रेघाटे

बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष माजी प्राचार्य बी. आर. कदम हे आयुष्यभर आंबेडकर चळवळीचे निष्ठावंत व प्रतिबद्ध नेतृत्व म्हणून सर्वश्रूत आहे. त्यांच्या जीवनावर आधारित "बी. आर." या आत्मचरित्राचा प्रकाशन समारंभ आणि अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे.

हा सोहळा बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता मालपाणी लॉन्स , शेतकी पेट्रोल पंपासमोर येथे होणार आहे. प्राचार्य बी. आर. या आत्मचरित्राचे संकल्पना आणि शब्दांकन डॉ. नामदेव गुंजाळ ,प्रकाश पारखे आणि  सिद्धार्थ नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास जगताप यांनी केले आहे.

या आत्मचरित्राचे प्रकाशन माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे तर प्रमुख उपस्थिती म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे, बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त ॲड. संघराज रूपवते, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे, बहुजन शिक्षण संघ विश्वस्त तथा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, एकविरा फाउंडेशनच्या डॉ. जयश्री थोरात आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमास  आपण आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन गुरुवर्य प्राचार्य बी. आर. कदम जीवन गौरव समितीचे निमंत्रक डॉ. नामदेव गुंजाळ, हिरालाल पगडाल , सूर्यकांत शिंदे, दत्ता आरोटे ,प्रकाश पारखे , मुख्याध्यापक विकास जगताप , ॲड. समीर लामखडे , डॉ. प्रज्ञा निकम तसेच कदम परिवारातील सदस्यांनी  केले आहे.

----- Advertisements -----

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम