ब्रेकिंग न्यूज :
भारत

‘‘आयुष्यावर बोलू काही'ने हजारो रसिक मंत्रमुग्ध!

Blog Image
एकूण दृश्ये: 51

‘‘आयुष्यावर बोलू काही'ने हजारो रसिक मंत्रमुग्ध!                        'संगमनेर फेस्टिवल प्रतिसाद ऊर्जा देणारा - सलील कुलकर्णी

    संगमनेर, भारत रेघाटे

'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमाने संगमनेर फेस्टिवलच्या दुसरा दिवस गाजवला. हजारो रसिकांना संदीप-सलील या जोडगोळीने मंत्रमुग्ध केले. संगमनेरकर रसिकांनी समरस होऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला. रसिकांचा क्षणोक्षणी मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यंत ऊर्जादायी आहे. इथे आलेला अनुभव आणि इथल्या या सुंदर आठवणी कधीही विसरणार नाही असे उद्गार संगीतकार, गायक डॉ.सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांनी काढले.

मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहा मध्ये भव्य रंगमंचावर 'आयुष्यावर बोलू काही' हा कार्यक्रम सादर झाला. दोन दशकांपासून संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भरगच्च उपस्थितीबद्दल दोन्ही कलाकारांनी रसिकांचे आभार मानले आणि आजचा प्रयोग हा दोन हजार तिसावा वा प्रयोग असल्याची माहिती. या कार्यक्रमाला 22 वर्षे उलटून गेली मात्र आजही रसिक तिकीट काढून मोठ्या संख्येने येतात आणि बालगीतापासून तर प्रणयगीत, प्रेमगीत, भावकविता, हृदयस्पर्शी गाणी, गमतीशीर गाणी अशा सर्व प्रकारच्या विविधतेने नटलेल्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देतात रसिकांचे हे ऋण कधीही न भेटणारे आहे अशी भावना व्यक्त केली.

    शीर्षक गीत ‘जरा चुकीचे जरा बरॊबर बोलू काही चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’ या गीताने सुरुवात करताच टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणाणून गेले. त्यानंतर पावसाळ्याचे दिवस असल्याने" सरीवर सर" या गाजलेल्या पावसाच्या गाण्याचे सादरीकरण करून त्या तालावर आणि ठेक्यावर त्यांनी श्रोत्यांना डोलायला लावले. आबालवृद्धांना नाचायला लावणारे 'अग्गोबाई ढग्गोबाई ' हे लोकप्रियतेचा उच्चांक निर्माण करणारे गाणे देखील त्यांनी सादर करून कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेला. दूरदेशी गेला बाबा, मी पप्पांचा ढापून फोन केले एकशे दोन , अशी एकापेक्षा एक सरस लोकप्रिय गाणी सादर केली आणि रसिकांना ताजेतवाने केले. दोन गीतांच्या मध्ये बोलताना अनेकदा निष्कील टिप्पणी करून कसदार विनोद निर्मितीचा आनंद श्रोत्यांना दिला. कवी संदीप खरे म्हणाले की पूर्वी गाणी सादर करायचो तेव्हा तरुण देखण्या मुली शेक हँड करण्यासाठी धडपडत यायच्या. आताही येतात पण आता नमस्कार करून आशीर्वाद मागतात. पण हरकत नाही. केसांचा रंग जरी पांढरा झाला असला तरी मनाचा रंग काय हिरवा असला पाहिजे असे त्यांनी मिश्किल म्हणताच जोरदार हास्याचा स्फोट झाला.

----- Advertisements -----

        सुमारे दोन तास या कार्यक्रमाने श्रोत्यांना अक्षरशः जागीच खिळवून ठेवले. जिवंत आजी नावाची हृदयाला स्पर्श करणारी कविता खरे यांनी सादर केली. स्वतःची सध्या हयात असलेली 95 वर्षांची आजी कशी टूणटूणीत आणि ठणठणीत आहे याचे किस्से सांगितले. हल्लीच्या तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या' असे त्यांनी म्हणतात एकच हास्यकल्लोळ झाला. फेस्टिवलच्या श्रींची आरती आणि वंदे मातरमच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मालपाणी उद्योगसमूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, गिरीश मालपाणी, राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष सुमित अट्टल, उपाध्यक्ष सागर मणियार, खजिनदार प्रतीक पोफळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी