
यावर्षी उसाचे उत्पादन कमी झाले. शिवाय पावसाची सुरुवात मे महिन्यातच झाली ही चिंताजनक बाब असल्याचे सांगत निळवंडे धरणाचे पाणी ओढ्या नाल्यातून वाहत आहे. पाण्याचे नियोजन करून ऊस उत्पादन वाढीसाठी या पाण्याचा सदुपयोग झाला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी ऊस आणि दूध हे शाश्वत उत्पादन आहे. त्यावर अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने शेतकरी वर्ग सक्षम होत असतो. टोमॅटो, कांदा फळबागा अन्य पिकांची काय अवस्था आहे आपण सर्वांनी बघितले आहे. ऊस वाढीसाठी काय नियोजन करता येईल ? ऊस वाडीचे क्षेत्र कसे वाढवता येईल ? तनिज कसे वाढेल ? भविष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठीच पूर्वनियोजन ही काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबत माजी मंत्री शरच्चंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत या विषयावर चर्चा झाली असल्याचे नमूद करीत ए आय आधुनिक तंत्रज्ञान हे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025 26 या गळीत हंगामासाठी पहिल्या मिल रोलर चे पूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, संचालक संपतराव गोडगे, इंद्रजीत थोरात, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ अरगडे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, लता गायकर, सुंदरा डूबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, साध्या उत्पादनाची लागवड विचारपूर्वक करावी लागेल. हंगामात ऊस उत्पादन घ्यावे लागेल तंत्रज्ञानाची साथ घेत आपल्याला पुढे जावं लागणार आहे . आधुनिक तंत्रज्ञानामुळे 16 ते 18 महिन्याचे पिक 12 ते 13 महिन्यावर येणार असल्याचे सांगून आपण याबाबत विचार करणार असल्याचे थोरातांनी सांगितले.

प्रत्येक हंगाम सीजन कष्टाचा असतो. अनेक वेळी आपल्या समोर आव्हान आहेत. ऊस क्षेत्र वाढीचे आव्हान आहे. प्रत्येक गोष्टीत व्यवस्थापन महत्त्वाचे असते. कुटुंबातील प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो. घरातील कर्ता पुरुष, कर्ती माणसे खूप महत्त्वाची असतात. कर्ता पुरुष हा खूप काटकसरी आणि काळजी घेणारा पाहिजे. कारखाना चांगला चालला तरच अर्थव्यवस्था सुरळीत राहील. प्रत्येकाचे मुले सुशिक्षित होतील. स्पर्धेच्या युगामध्ये टिकणे कोणासाठीही सोपे राहिले नाही. यश मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला कष्ट घ्यावेच लागणार आहेत. परमेश्वराच्या आणि पूर्वजांचे कृपादृष्टी आणि कर्माची जोड दिल्यास भविष्य उज्ज्वल होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. समस्या नसलेला माणूस अथवा कुटुंब या जगात कुठेही आढळून येणार नाही. अशी माणसे जगात भेटणे अवघड आहे. अशी माणसं भेटली तर त्यांच्या कडून मंत्र नक्कीच घेऊ असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा.चेअरमन पांडुरंग घुले यांनी आभार मानले.

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.
महात्मा गांधी