आदिवासी ड्राय डे वर पोलिस कारवाईत एका व्यक्तीसह ₹ 3,35,360 अवैध दारू जप्त
संगमनेर प्रतिनिधी
शहर पोलिस हद्दीतून दारूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याच शहर पोलिसांनी धडक कारवाई करत एका व्यक्तीला अवैध दारूसह ताब्यात घेतले.

शुक्रवार, दि. ८ तारखेला रात्री ९:३० वाजता संगमनेर खुर्द परिसरात वरिष्ठ पोलीस पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली सापळा रचण्यात आला.

सदर ड्राय डे वर बेकायदेशीरपणे दारू विक्री करण्याच्या उद्देशाने राजेश बबन शिंदे, वय ४०, रा. शाहुनगर, अकोले, जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून ३,३५,३६० रुपयांची देशी दारू तसेच कार क्रमांक एम एच १४ एक्स ६५१० जप्त करण्यात आली. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोले शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त साजरे करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसंदर्भात, शनिवार, ९ तारखेला शहर परिसरात ड्राय डे पाळण्याचे आदेश देण्यात आले. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीरामपूर चे सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. कुणाल सोनवणे यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस रावसाहेब लोखंडे, विशाल करपे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार यांच्या पथकाने धडक कारवाई केल्याने पोलीस पथकाचे कौतुक केले जात आहे.
