ब्रेकिंग न्यूज :
भारत

आत्मज्ञानातूनच आत्मसशक्ती जागृत होते :- भारती दिदी

Blog Image
एकूण दृश्ये: 337

आत्मज्ञानातूनच आत्मसशक्ती जागृत होते :- भारती दिदी.             [ 108 मातांचा सन्मान ] 

      संगमनेर { प्रतिनिधी }

आजच्या तणावग्रस्त अशा परिस्थितीत विश्वामध्ये एकता निर्माण होण्यासाठी मानवाला आत्मज्ञानाची गरज आहे. याच ज्ञानातून आत्मशक्ती जागृत होते. आत्मज्ञानातून प्रत्येक जीवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आत्मा हा परमेश्वरी अंश आहे. विश्वातील प्रत्येक माणूस हा बांधव आहे. 'हम सब भाई भाई'  ही भावना प्रतीत झाली पाहिजे. या उद्दात्त भावनेने, आचरणाने विश्व एकता सहज साध्य होऊ शकते असे प्रतिपादन ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या संचालिका भारती दीदी यांनी केले .

          गोल्डन सिटी, तपस्या भवन येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने मातृदिन तसेच ब्रह्माकुमारी केंद्राच्या यावर्षीच्या विश्व एकता आणि विश्वासासाठी योगसाधना या संकल्पनेचे उद्घाटन प्रसंगी तसेच 108 मातांचा सन्मानित  करण्यात आले त्यावेळी मार्गदर्शन करताना  भारती दीदी बोलत होत्या. 

यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डेरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका अंकिता डेरे, निसर्गोपचार तज्ज्ञ शीलाकरंजेकरू सामाजिक कार्यकर्त्या अमृता राऊत आदि उपस्थित होते.  याप्रसंगी विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 108 मातांचा परमपिता शिव परमात्म्याचे स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. भारती दिदी पुढे म्हणाल्या की, विश्वास स्वतःवर, परमात्म्यावर, परस्परांवर त्याचबरोबर या सृष्टीरुपी नाटकावर असणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. ब्रह्माकुमारी पद्मा दीदींनी उत्तम स्वास्थ्यासाठी सुखी संपन्न जीवनासाठी शारीरिक आरोग्यासह मानसिक व भावनिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे तसेच उपस्थित मातांना अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांच्या जीवनात अध्यात्मिकता असेल तर जीवन सहज आणि सुखकर होत व त्यासाठी राजयोग मेडिटेशन हे उत्तम साधन आहे असे सांगून राजयोग मेडिटेशनचे प्रात्यक्षिक करून घेतले.

----- Advertisements -----

प्रमुख अतिथीं माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या समाजात प्रत्येक व्यक्तीला आज अध्यात्माची गरज आहे. विद्यालयाच्या वतीने घेतला जाणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे त्या म्हणाल्या. शीला करंजेकर यांनी माता-भगिनींना उत्तम आरोग्यासाठी सात्विक आहार, विहार पद्धती वर मार्गदर्शन केले. अंकिता डेरे अमृता राऊत यांनीही उपक्रमाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी ब्रह्माकुमारीच्या नव्या उपक्रमाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. 

सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी डॉ. योगिनी दीदी यांनी केले. केंद्राच्या वतीने चालवले जाणारे विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी ओम शांती परिवारातील सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin