आता गुरखा विझवणार गल्ली बोळातील आग ; संगमनेर विकासासाठी कटिबद्ध: आ. खताळ
अग्निशमनचे लोकार्पण
संगमनेर [ भारत रेघाटे ]
अनेक ठिकाणी वस्त्यांचा गजबजाट झालेला असतो. त्या ठिकाणी एखादी आगीची दुर्घटना घडल्यास पोहोचणे दुराप्रास्त होते अशा वेळेस मनुष्य , परिसर, आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते. अशा मोठ्या दुर्घटनेला प्रतिबंध बसण्यासाठी गोरखा अग्निशमन वाहन नगरपालिकेत दाखल झाले आहे. अत्याधुनिक गुरखा अग्निशामन या वाहनाचे लोकार्पण आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अमोल खताळ म्हणाले की, शहरातील आगीच्या दुर्घटनेस या वाहनामुळे प्रतिबंध बसेल.

महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानां अतर्गत नगरपालिकेला महायुती सरकारच्या माध्यमातून नवीन अग्निशामक (गुरखा) मिनी रेस्क्यू अग्निशमन वाहन मिळाले असून त्या वाहनाचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडला. या वेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी रामदास कोकरे, कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ, प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक ऍड.श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक जावेद जागीरदार , ज्ञानेश्वर कर्पे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे, शहर अध्यक्ष दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, रामभाऊ जाजू ,शौकत जहागीरदार, रोहित चौधरी, सौरभ देशमुख, विकास पुंड, विकास डमाळे, भाजपच्या शहराध्यक्षा पायल ताजने, माजी नगरसेविका अल्पना तांबे, मेघा भगत, कांचन ढोरे, यांच्या सह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले,की " संगमनेर शहरात अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद आहे त्यात एखादा अपघात घडल्यास अशा वाहनांची गरज भासते आणि आता हे वाहन वेळेवर पोहोचून नागरिकांचे प्राण वाचवू शकेल असा विश्वास तमाम शहरवासीयांना खताळ यांनी दाखवला. ते म्हणाले की, संगमनेरमध्ये विकास कामे करत असताना अनेक अडथळे येतात तर काही जण, अफवा पसरवितात. मात्र मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो केंद्रात, राज्यात, तालुक्यात महायुतीचे सरकार असल्याने तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. नगरपालिकेत येणाऱ्या सर्वसामान्य लोकांची कामे मार्गी लागलेच पाहिजे. यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची शिफारस न घेता नगर पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अल्पावधीतच यांनी संपूर्ण शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण केले आहे. मात्र काही माजी नगरसेवक अजूनही सत्ता असल्याच्या थाटात वागत आहेत. यावर उपाययोजना करा असे सक्त निर्देश आ. खताळ यांनी मुख्याधिकार्यांना दिले.

संगमनेर नगरपालिकेत नव्याने दाखल झालेल्या गुरखा या अग्निशमन वाहनाचा उपयोग, त्याचे कार्यक्षेत्र, आणि भविष्यातील बचाव कार्यातील भूमिका याविषयी सविस्तर माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली. सूत्रसंचालन राजेश गुंजाळ यांनी केले. आभार प्रल्हाद देवरे यांनी मानले.

*गुरखा व्हेईकल ची खासियत*
राज्य शासनाकडून संगमनेर नगरपालिकेत गुरखा अग्निशमन व्हेईकल दाखल झाली आहे. छोट्या आकाराची (मिनी रेस्कयू) असलेली अत्याधुनिक गाडी गल्ली बोळात जाऊन अग्नीचे शमन करेल. पाणी, फोम, वेगवेगळे फोकस लाईट, साहित्य, गॅस, मूलभूत सुविधा आदि सोय असल्याने तसेच या नवीन साधनांचा वापर केल्याने तात्काळ आग विझण्यास मदत होईल.

भगवा फडकवायचा आहे :- अमोल खताळ
नगर विकास विभाग हा उपमुख्यमंत्री व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत आहे. त्यांचे संगमनेरवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे येत्या काळा मध्ये त्यांच्या योगदानातून संगमनेर शहराच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव निधी आणणार आहे. पालिकेत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना केल्या असून कांग्रेस माजी नगरसेवकांची चाललेली मनमानी आता खपवून घेणार नाही. नगरपालिकेत महायुतीची सत्ता प्रस्थापित करणार असल्याचे आव्हान खताळ यांनी यावेळी दिले.
