ब्रेकिंग न्यूज :
भारत

आता अहिल्यानगर जिल्ह्यात कदापिही असे काही होणार नाही !

Blog Image
एकूण दृश्ये: 174

आता अहिल्यानगर जिल्ह्यात कदापि असे काही घडणार नाही !

नागरिकाच्या वेदनेला मिळणार न्याय.     

अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांचे संकेतस्थळ (स्कॅनर ) बनले प्रशंसक ;      

काय म्हणाले ? पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे          


     अहिल्यानगर (भारत रेघाटे)

असे म्हणतात की,पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी कधीच कोणाच्या वाटेला येऊ नये. परंतु ऐनकेन प्रकारे अनेक वेळा आपल्यावर  अन्याय होतो अशा वेळी मात्र आपण भीती बाळगत पोलिसांकडे जातच नाही. उगाच पोलीसी खाक्या अथवा पोलिसांचा ससेमिरा कशाला पाठीमागे लावून घ्यायचा. म्हणून अनेक नागरिक आपल्या वेदना तशाच हृदयात दाबून ठेवतात. परंतु आता तसे कदापिही होणार नाही. यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नागरिकांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाबद्दल वाटत असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तसे सर्व सामान्यांची भीतीच आता बाजुला सारण्यासाठी एक नामी शकल लढवून त्रस्त नागरिकांनी आपल्या चांगल्या भावना, प्रतिक्रिया, अथवा वाईट अनुभव कळविण्याचे आवाहन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी एका संकेतस्थळ निर्माण केले असून या स्कॅनरच्या माध्यमातून आपली आवश्यक असलेली माहितीच यावर पाठवू शकता. आपल्यासह इतरांनाही आपण यातून न्याय देऊ शकता. तसेच पोलिसाबद्दल असलेली वाईट अथवा चांगली भावना किंवा आपणास आलेले अनुभव व्यक्त करता येणार सांगता येणार आहेत. 

 माहिती गोपनीय राहणार आहे 

        -विशेष म्हणजे आपले आणि आपल्या सहकार्याच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगा इतिवृतांत हा गोपनीय राहणार आहे. या उपक्रमाची सुरुवात होताच अनेकांनी या स्कॅनरवर चांगल्या आणि वाईट अनुभवाची नोंद केल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

अहिल्यानगर पोलीस प्रशासनाची झळकतेय मोहर 

याबाबत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे काय म्हणाले ?30 जूनला सदर स्कॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले. एकाच दिवसात अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियाही यावर कळविल्या असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. खरं तर हा विषय खूप "पॉझिटिव्ह" असून समाजाच्या ज्वलंत विषयाला प्रत्यक्षात दाद मिळेल असे मत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी व्यक्त केले.. ते म्हणाले की, आपल्या बाजूला अनेक समस्या आहेत, प्रश्न आहेत . त्यामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न असेल, गंठण चोरीचा प्रश्न असेल, अपघाताचा प्रश्न असेल, अशा अनेक घटनामध्ये नागरिकांना सहज काही गोष्टी उपलब्ध होणे, न्याय मिळणे गरजेचे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून एकप्रकारे नागरिकांना मदतच मिळणार आहे असे ते म्हणाले.

----- Advertisements -----

प्रश्न :- या उपक्रमाने पोलीस यंत्रणेवरील ताण वाढेल का ?   

 --- असे विचारले असता. ते म्हणाले की, पोलिसांवरचा ताण वाढणार नसून यातून पोलिसांना तात्काळ घटना अथवा काही महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्याने प्राथमिकता देणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. नागरिक जोडल्या गेले पाहिजे. त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करता आला पाहिजे. कारण पोलीस ही सेवा आहे. नागरिकांचे मत लक्षात घेतले गेलेच पाहिजे. आतापर्यंत ही सेवा सुरू केल्यानंतर तब्बल हजारोच्या संख्येने आमच्याकडे सकारात्मक आणि निगेटिव्ह प्रतिक्रिया आल्या आहेत. खरंतर या नागरिकांच्या तक्रारी नव्हेच! असे सांगत नागरिकांची ही महत्वाची गरज आहे. पोलीस यंत्रणाच यामुळे इम्प्रू होत आहे. पोलीस यंत्रणेसाठी हा उपक्रम दिशादर्शक असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी व्यक्त केली.

 

संकेतस्थळ बनले काही तासातच प्रशंसक !                  अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कडून एका संकेतस्थळांचा नागरिकांच्या सोयीसाठी एक संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे या संकेतस्थळाला एक अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून हे संकेतस्थळ काही तसात प्रशंसक बनले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सदर पोर्टलवर व्हिडिओही प्रसारीत करण्यात आला आहे.

कठीण काळातही आत्मविश्वास ठेवा.

महात्मा गांधी