ब्रेकिंग न्यूज :
भारत

आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांना मातृशोक ;

Blog Image
एकूण दृश्ये: 165

आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांना मातृशोक ; सुमन कासार यांचे निधन 

     संगमनेर प्रतिनिधी 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले पक्षाचे संगमनेर शहराध्यक्ष कैलास कासार यांना मातृशोक झाला. त्यांच्या मातोश्री सुमन राजाराम कासार वय 68 यांचे काल रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा देवाचा मळा राहते घरापासून सकाळी 10 वाजता निघणार आहे.

      सुमन कासार यांना रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांच्या हृदयाला तीव्र वेदना होत होत्य. या झटक्यामध्ये हृदयविकाराने गुरुवार दिनांक 18 रोजी मध्यरात्री दीड वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संगमनेर शहर तालुका आणि राजापूर मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एक शांत मनमिळावू स्वभाव म्हणून सुमन अक्का सर्वांना परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, चार मुली, नातू असा परिवार आहे.

          अंतिम दर्शन.                  सुमन कासार यांचे निधनाचे वृत्त समजतात अनेकांनी शोक संदेश देत घरीही अंतिम दर्शन घेतले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीही फोन व्दारे संपर्क करून कैलास कासार यांचे सांत्वन केले. तसेच संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनीही संपर्क करून कैलास कासार यांना धीर देत परिवाराबद्दल चौकशी केली. यावेळी विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील‌ अनेकांनी कासार यांच्या घरी जाऊन अंतिम दर्शन घेत कासार कुटुंबीयांचे सांत्वन करत भेट घेतली.

----- Advertisements -----

शिक्षणाशिवाय जीवन अधू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin