संगमनेर { भारत रेघाटे }
गणेश उत्सव हा आपल्या सर्वांचा श्रद्धेचा विषय आहे तसाच तो आनंदाने साजरा केला पाहिजे. हा आनंद साजरा करत असताना श्रद्धेने आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. डीजे, लेझर लाईट , गुलालामुळे आरोग्यास हानिकारक ठरवून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते भक्ती भावाने आरोग्याची काळजी घेत उत्सव साजरे केले पाहिजे असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देत संगमनेरकर तसेच नागरिक आणि भाविकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन थोरात यांनी केले.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आजी- माजी आमदार यांच्या "प्रभा" यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची आरती माझी महसूल मंत्री तथा काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले की,आनंद उत्सव हा श्रद्धेचा विषय आहे परंतु दुसरीकडे डीजे लेझर लाईट गुलालामुळे शारीरिक इजा होऊन लेझर व डीजेमुळे अंधत्व येऊ शकते तर डी जे मुळे त्याचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होताना दिसून येतात माणसाचे हृदय बंद पडू शकते बदलता येऊ शकते. अशा अनेक घटना सभोवताली घडल्याचे आपण सर्वांनी ऐकल्या आहेत पाहिल्या आहेत. तर गुलालामुळे फुफुसाचे गंभीर आजार उद्भवू शकतात. गणपती उत्सव हा निसर्गाशी नातं सांगणारा असून आनंदोत्सव साजरा करताना भारावून जाण्यापेक्षा आपण या निसर्गाचे तत्त्व जपत आपले धार्मिक सण साजरे करत सर्वांनीच आरोग्याची काळजी घेत दक्षता पाळली पाहिजे असे आव्हान थोरात यादी गणेश उत्सवानिमित्त केले.
आवाजामुळे शारीरिक इजा होऊन माणसाला बधिरता येऊ शकते शरीराचा आरोग्याचे नुकसान होऊ शकततर लेझर किरणामुळे आरोग्यास घातक असून त्यामुळे दृष्टी जाण्याची अंधत्व येण्याची शक्यता असते या घटनेमुळे अनेकांची ही दृष्टी केल्याचे आपण बघितलेले आहे ऐकलेले आहे तर गुलाल सुद्धा आरोग्याच घातक असून गुलालामुळे फुफुसाचे आजार उद्भवू शकतात खर तर गणपती उत्सवा निसर्गाशी नातं सांगणारा असून हा आनंद उत्सव साजरा करताना भारावून जाण्यापेक्षा आपण या निसर्गाच्या तत्त्वाशी जपले पाहिजे यामध्ये आरोग्य ही महत्त्वाच्या असून ते आपण जपले पाहिजे गुलाल किरण लेझर आणि डीजे टाळले पाहिजे असे आव्हान माझे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले
सुखाचे रहस्य समाधानात आहे.
संत ज्ञानेश्वर