ब्रेकिंग न्यूज :
भारत

आनंदाला उधाण आले ; संगमनेरात लाडके देव बाप्पा आले गणरायाचे जल्लोषात स्वागत

Blog Image
एकूण दृश्ये: 78

लाडके देवबाप्पा आले संगमनेर आनंदाला उधाण आले ;

श्री गणरायाचे जल्लोसात स्वागत ! माजी मंत्री थोरात, आमदार खताळ, आमदार तांबे यांच्या घरी देव बाप्पाचे आगमन ; शुभेच्छा सह दिला संदेश ;ढोल, ताशे, नगारे अन् बरेच काही ....

   संगमनेर भारत रेघाटे

सोमेश्वर मित्र मंडळ रंगारी गल्ली अध्यक्ष रोशन आमले, चौंडेश्वरी मित्र मंडळ कोष्टी गल्ली संतोष ढोले, साळीवाडा तरुण मित्र मंडळ अध्यक्ष शैलेश कलंत्री ,राजस्थान मित्र मंडळ अध्यक्ष मनीष मालपाणी, चंद्रशेखर चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष शुभम लहामगे, नेहरू चौक मित्र मंडळ अध्यक्ष गजेंद्र नाकील, स्वामी विवेकानंद मित्र मंडळ नवघर गल्ली मित्र मंडळ, भगतसिंग मित्र मंडळ असे मानाचे मित्र मंडळ असून संगमनेर शहरात छोट्या- मोठ्या शेकडो मित्रमंडळासह श्री गणेशाचे आगमन ढोल ताशे नगाराच्या गजरात अन मोठ्या हर्षोल्लोषात आगमन झाले. याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन या निवासस्थानी श्री गणरायाचे आगमन झाले. तसेच आमदार अमोल खाताळ, यांच्याही निवासस्थानी हर्षोल्लासाने श्री गणेशाचे आगमन झाले. 

मराठा आंदोलन यशस्वी होऊन आरक्षण मिळू दे -- थोरातांनी केली प्रार्थना

-  यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आहे. मात्र काही भागांमध्ये कमी पाऊस आहे. सर्व भागांमध्ये चांगला पाऊस होऊन राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना करताना मराठा समाजाच्या मागणीसाठी सुरू झालेले मनोज जरांगे यांचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळू दे अशी प्रार्थना काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी गणेश चरणी केली आहे.  सुदर्शन निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना मा महसूल व कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाली. यावेळी कांचन थोरात, डॉ जयश्री थोरात, प्रा. डॉ. हसमुख जैन आदी उपस्थित होते. विधिवत पूजा करून श्री गणेशाची स्थापना यावेळी करण्यात आली. याच बरोबर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले आंदोलन संघटितपणे पुढे जात आहे. हे आंदोलन यशस्वी होऊन मराठा समाजातील गरीब घटकांच्या जीवनात आनंद व समृद्धी निर्माण व्हावी अशी प्रार्थना ही त्यांनी केली. ते म्हणाले की, आरक्षणाचा विषय हा न्यायालयीन कक्षेत येतो. त्यामुळे त्यावर बोलण्याच्या मर्यादा आहेत. परंतु हे आंदोलन म्हणजे लोकचळवळ आहे. समाज संघटित येतो आहे तेव्हा सरकारने त्यांच्या मागण्यांना मान देऊन तातडीने आरक्षण लागू केले पाहिजे. ओबीसी, आदिवासी, व मागासवर्गीय यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे जेणेकरून मराठा समाजातील गरीब घटकाला त्याचा लाभ होईल. सध्या देशात व राज्यात भाजपा प्रणित सरकार आहे .त्याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे. केंद्र सरकार हे बहुमताच्या जोरावर लोकशाहीला न पचणारे अनेक निर्णय घेत आहे. मराठा समाजाच्या जनभावनेचा आदर करून आरक्षणाची टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे. याकरता केंद्राने पुढाकार घ्यावा अशी मागणी करताना महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे थोरात म्हणाले.

----- Advertisements -----

आमदार खताळ यांच्या साई हर्ष मध्ये लाडक्या गणरायाचा हर्षोल्लास 

घुलेवाडी रोडवरील आमदार अमोल खताळ यांच्या साई हर्ष या निवासस्थानी आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा आरती करून गणरायाची भक्तिमय वातावरणामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी वडील धोंडीबा खताळ,आई मंगल खताळ, राहुल खताळ शीतल खताळ यांच्यासह खताळ परिवार उपस्थित होता. खताळ म्हणाले की, संपूर्ण देशासह राज्यामध्ये सर्वत्र गणेश उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. मतदार संघातील सर्वच जनतेवर कृपा आशीर्वाद असू द्या एकत्रित सर्वजण गुण्या गोविंदाने नांदले पाहिजे अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी आ अमोल खताळ यांनी केली.

आमदार तांबेच्या "प्रभा" निवासस्थानी देव बाप्पा विराजमन_ 

नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रभाया निवासस्थाने देवबाप्पा विराजमान झाले त्यांनी संगमनेरच्या बाजार पेठेचे तोंडभरून कौतुक करत कुटुंबासमवेत आनंद घेण्याचे आवाहन केले. श्री गणरायाचे आगमन म्हणजे आनंदाचा उत्सव असल्याचे सांगत, कायदा सुव्यवस्थेचा आदर राखून पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या आनंद उत्सवाच्या तांबे यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्यात.

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक