आणीबाणीचा सुवर्ण महोत्सव होणार साजरा; जिल्हाधिकारी यांच्या हस्तेआणीबाणीचा सुवर्ण महोत्सव होणार साजरा; जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सचित्र माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन ; लोकशाहीसाठी जिल्ह्यातील 133 लोकांचे योगदान
अहिल्यनगर भारत रेघाटे
देशात 25 जून 1975 ला आणीबाणी लागू करण्यात आली होती या घटनेला येत्या २५ जून २०२५ रोजी ५० वर्ष पूर्ण होत आहे.

आणीबाणीच्या सुवर्ण महोत्सवा निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार, दि. २५ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते या सचित्र माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात घडलेल्या विविध घटना-घडामोडींची तसेच आणीबाणी विरोधी संघर्षात सहभागी झालेल्या विविध कार्यकर्ते-नागरिकांची छायाचित्रे व माहितीचा समावेश असणार आणीबाणी मध्ये सहभागी झालेले नागरिक त्यांच्या कुटुंबीयांनी तळ मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केले आहे.

आणीबाणी मध्ये या कार्यकर्त्यांना लोकशाहीच्या संरक्षणासाठी बंदीवास सहन करावा लागला. संघशिस्त, राष्ट्रनिष्ठा या कार्यकर्त्यांनी जपली. सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या आणीबाणी मध्ये नगर जिल्ह्यातील तब्बल 133 लोकांनी आपले योगदान दिले आहे. त्यामध्ये अकोले तालुक्यातील गुलाब देशमुख, दशरथ सावंत, सुधा देशपांडे, चंद्रभान टेके,

संगमनेर शहरातून
प्रदीप मालपाणी, प्रकाश ओझा, विजय गुणे, चंद्रकांत पेमगिरीकर, अशोक सराफ, वंदना देशपांडे, रुबिया शेख, पुष्पा राधावल्लभ कासट,
कर्जत तालुक्यातून
विठ्ठल कारभारी जगताप, मानसिंग निंबाळकर, हिम्मत लाल शहा, पुष्पलता कानडे, शिवाजी जाधव, आशा मंत्री, पोपटलाल देसाई, रमेश झरकर, बाळासाहेब भोसले, लीलावती जेवरे, अरुण भणगे, रोहिणी मोकाशी, सुंदर साळुंखे, सुनंदा चव्हाण, विश्वनाथ मुळीक, महादेव बेंद्रे, बाबुराव ढवळे, संजीवन तनपुरे, अलका कोठारी, वत्सला हरीभाऊ भुससळे, सुमन टाक,
कोपरगाव येथून
सुरेश बंब, प्रकाश सवाई, बाळकृष्ण भागवत, इंदिरा कुलकर्णी, भाग्यश्री बडदे, हंसप्रभा राठी, राधाकिसन दवंगे, भीमराव घोटेकर, नारायण दवंगे, श्रीकांत बागुल, गंगाधर देशपांडे, रंगनाथ खंडागळे, प्रदीप जोशी, मुकुंद कालकुंद्री, मदन गवळी, सुभाष रणवरे, अशोक वहाडणे, शांताबाई चौधरी, अलका बडदे विमल दवंगे स्वाती मुळे स्नेहलता चौधरी ,
राहाता
लक्ष्मण जगदाळे, सुभाष कोते, अरुण कुमार दोडिया, स्वप्नाली जोशी, बाबू पुरोहित, जनार्दन वहाडणे, सोपान गाडेकर, सुमती लुम्पाटकी, सुनिता सराळकर, मुक्ताबाई गोंदकर, लताबाई कुराडे, पुष्पावती साळुंखे, विमल जोशी, कमल वहाडणे, उज्वला संकलेचा,
श्रीरामपूर
रमेश बागुल, अविनाश आपटे, किशोर देशपांडे, हेरंब औटी, उषा कुलकर्णी, शांताबाई व्यास, प्रमिला कुलकर्णी, वत्सला कुटे, रेखा कुलकर्णी, सुनीता गोरडे, सुहाष वाडगीकर, बन्सीलाल मुंदडा, उमाकांत कडूसकर,
पारनेर ; तालुक्यातून कुसुमबाई पठारे, अशोक थोरात,
नगर शहरातून
गोवर्धन छप्पनिया, कांतीलाल सुराणा, बाळकृष्ण कडूसकर, प्रकाश गटने, धनंजय देशपांडे, पद्मनाभ सासवडे, शहा अलम मोहम्मद जहागीरदार, शेख आलम, शकुंतला महाले ,आशाबी शेख चांद, सरस्वती गुजराती, जहाँआरा शेख, पंचफुला वाघ, काशीबाई हैडा, परवीन शेख, इंदिरा मुथा, प्रकाश गोखले, नरेंद्र कुलकर्णी, दीपक दिवेकर, मोहन नातू, पद्माकर देशमुख, सतीश झिकरे, नंदलाल जोशी, संजीव ख्रिस्ती, बालकृष्ण खंदाट, सतीश मुळे, रवींद्र बडदे, सुशीला कापसे ,
नेवासा
सुरेश नळकांडे, दिनकरराव ताके, मोहन खराडकर, विलास गुजराती, मारुती आलवणे, गणेश जोशी, अरविंद देशपांडे, शांताबाई गुजराती, शकुंतला मापारी, शकुंतला नळकांडे,
जामखेड ; हिरालाल गुंदेचा, श्रीपाद पाटील, छदाकबाई काकडे, अनुराधा देशमुख,
राहुरी ; जयवंत साळवे, कुसुम येवले, मनकर्णा खांदे ,
श्रीगोंदा; शाहूराव रासकर, तर पाथर्डी विलास पुंड, बाबूलाल पठाण अशा 133 लोकांचे योगदान लाभले आहे.
