ब्रेकिंग न्यूज :
भारत

आमदारांच्या मागणीचा पोलिसांनी घेतला धसका ! कत्तलखान्यावर छापा !

Blog Image
एकूण दृश्ये: 136

आमदारांच्या मागणीचा पोलिसांनी घेतला धसका !  कत्तलखान्यावर छापा; १२ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त ; तिघे फरार 

   संगमनेर : भारत रेघाटे

शहर पोलिसांनी शहरातील कत्तलखाण्यावर धाड टाकत लाखो रुपयांचे गोमांसासह हत्यार आणि वाहने जब्त करण्यात आली असून पोलिसांनी कत्तलखाण्याचा पर्दाफाश केला आहे. तब्बल १२ लाख ५५ हजाराच्या गोमांससह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान अंधाराचा फायदा घेत तीनही आरोपीं मात्र पलायन करण्यात यशस्वी ठरले.

    शहरातील कत्तलखान्याबाबत आवाज उठवूनही येथील कसाई पोलिसांना न जमानता मुक्या जनावरांच्या मानेवर सुरी चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून पुन्हा समोर आला.

          बहुचर्चित मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर ५ येथे गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाल्यावर त्यांनी बुधवार दि ९ मध्यरात्री ३.१५ वाजेच्या सुमारास मदिना नगर परिसरातील गल्ली नंबर पाच मधील फैजू फारुक कुरेशी यांच्या पत्र्याच्या वाड्यात आपल्या पथकासह छापा टाकला असता तेथे कमरअली गुलाम जिलानी सौदागर हा कत्तल करत होता तर शहबाज बुटन कुरेशी हा चार चाकी वाहनात गोमांस भरत होता. पोलिसांना पाहताच या दोघांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. 

सदरची कार्यवाही पोलीस पथकातील राहुल डोके, अनिल कडलग, राहुल सारबंदे यांनी केली पथकाने फैजु फारुक कुरेशी यांच्या वाड्यावर छापा टाकला असता, तिथे एक व्यक्ती गोवंश कत्तल करताना, तर दुसरा कत्तल केलेले गोमांस वाहनात भरताना आढळून आला. पोलिसांना पाहताच आरोपी कमरअली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुटन कुरेशी यांनेही अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळा वरून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते तिघेही फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता, सदर वाडा फैजु फारुक कुरेशी यांचा असल्याचे समोर आले. घटनास्थळाची आणि वाहनाची पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणात गोमांस आणि गोमांसाचे अनावश्यक अवयव आढळून आले. तसेच, कोयता, लोखंडी हत्यार, वजन काटा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमाला मध्ये ५,००,०००/- किमतीची महिंद्रा झायलो (एमएच ०२ बीएम १५०३) गाडी, रु. ७,५०,०००/- किमतीचे २५०० किलो गोमांस आणि अवयव, लोखंडी कोयता, रु. ५,०००/- किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा यांचा समावेश आहे. एकूण रु. १२,५५,०००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे.  

    या बाबत पोलीस राहुल डोके यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, कमरअली गुलाम जिलानी सौदागर, शहबाज बुटन कुरेशी (जमजम कॉलनी), आणि फैजु फारुक कुरेशी (जमजम कॉलनी), या तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५, ३ (५) सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन १९९५ (सुधारित २०१५) कलम ५, ५ (क), ९, ९ (अ) सह ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

----- Advertisements -----

  

आमदार खताळांचा आवाज गरजला अधिवेशनात!

संगमनेर मधील गो हत्या हा अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाचा प्रश्न या अधिवेशनात मांडल्याने कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरासह तालुक्यातील कत्तलखाने ही नित्याचीच डोकेदुखीची बाब बनलेली असून यावर कायदे होऊनही कारवाई होत नसल्याने याबाबतचा गंभीर प्रश्न संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी पावसाळी अधिवेशनात मांडल्याने संगमनेर शहर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.

स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमच्या यशाचा पाया आहे.

अज्ञात