यावेळी भाजप राज्य कार्यकारी परिषद सदस्य दादाभाऊ गुंजाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे, किसन शिंदे, रुपम गाडेकर, मछिंद्र भागवत, काशिनाथ साबळे , सोन्याबापू ठोसर, बाबासाहेब ठोसर, संदीप बेंद्रे, गणेश शिंदे, राजेंद्र शिंदे, आप्पा बेंद्रे, आदीसह मनोलीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसंग आहे संगमनेर तालुक्यातील मनोली गावातील हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान घडलेला. चक्क "आमदार नावाचा गडी अन खेळतो फुगडी." चा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झालेला असून या चर्चेला चांगलेच उधान आले आहे.

फुगडी आणि लंगडी हा तसा मुली अन् महिलांचा खेळ. बालपणी हा खेळ सर्वच खेळतात. एक माणुसकीचं नातं म्हणून अचानकपणे अशा वेगळ्या प्रसंगांना अनेकांना सामोरे जावे लागतं. मग इच्छा नसूनही मनधरणी करत कधी कधी दोन हात जुळून येतात. मग ते खेळातील असो, विनोदाचे असो, कदाचित विरोधाभासाचेही असतील. अशाच एका अनोख्या फुगडी खेळण्याचा प्रसंगाला संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांना सामोरे जावे लागले. जेव्हा मनोलीत हनुमान मंदिरात अखंड हरिनाम कथेला ते जातात अन् अचानक फुगडी प्रसंगाला ते सामोरे जातात. मग काय ! आमदारही खेळतात फुगडी .

"आमदार गडी खेळतो फुगडी" या एकमेव चर्चेने तालुक्यात मात्र चर्चेला उधाण आले. असे अनेक प्रसंग कधी तरी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार, यांच्या बाबतीत घडतात. परंतु ऐनकेन प्रकारे सोशल मीडियावर मात्र त्यांना ट्रोल व्हावेच लागते. परंतु ती सुध्दा माणसेच आहेत ना. जीवनात आलेला थकवा अथवा विरंगुळा म्हणून असे अनेक प्रसंग आयुष्यात येत असतात. त्यास सामोरे जावेच लागतं. तर दुसरीकडे शहरात वाढता समस्याचा राहाडा, तो सोडविण्यासाठी आमदारा पुढे नागरिकाचा नेहमीच असतो गराडा. मग यातून थोडीशी तरी उसंत नको का ? आमदार महाशयांनी "आपला माणूस आपल्यासाठी" म्हणत हाताला साथ देत मनोलीत फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला. तो एक सौहार्द नि मैत्रीपूर्ण हितसंबंध जपण्यासाठीच. परंतु दुसरीकडे मात्र त्यांच्या या वर्तनाने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकास्त्र सोडले गेले. तर कोणी म्हणतं नका होऊ ट्रोल. करा कंट्रोल अशी काहीशी प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसून येत असली तरी काहीही असो सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडिओ होता आडवा. याच व्हिडिओने तालुक्यात वाढवला मात्र गोडवा. हेही तितकेच खरे. शेवटी काय, ? आमदार गडी खेळले छान फुगडी ! असे म्हणावे लागेल.

अखंड हरिनाम सप्ताहाला आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली. सप्ताह कमिटीचे अध्यक्ष देविदास शिंदे यांच्या हस्ते आ.अमोल खताळ यांचा सन्मान करण्यात आला.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, तालुक्याचे प्रतिनिधीत्व करत असताना आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण अखंड हरिनाम कथेला देता आले. हे माझे भाग्य समजतो. यावेळी काही अबालवृद्ध, पुरुष , आजीबाई शाळकरी मुली तसेच बाल वारकऱ्यां समवेत आमदार अमोल खताळ यांनी फुगडी खेळली. खताळ म्हणाले आमच्या परिवाराला धार्मिकतेचा वारसा लाभलेला आहे, माझी आई प्रत्येक वर्षी वारी करते. वारीतून खऱ्या अर्थाने एक सकारात्मक ऊर्जा मिळते. तशीच एक सकारात्मक ऊर्जा अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून मिळते. अध्यात्म आपली बलस्थाने आणि ऊर्जास्रोत असल्याचे आमदार अमोल खताळ म्हणाले. अशा कथांतून समाजाच्या व्यथा दूर करता येतात. या प्रसंगी दिलखुलास होऊन चिमुकलेही आमदारा सोबत फुगडीत चांगलेच चमकले. आमदार पण तेवढेच हरवून गेले. या मातीला ते नतमस्तक झाले. आबालवृद्ध, पुरूषांना तर यागोष्टीचे अप्रूप वाटले. एका आजीबाईने तर भन्नाट होत या फुगडीचा आनंद लुटला. खताळ म्हणाले मी या तालुक्याचा गडी येथील महिला, पुरुष , अबालवृद्ध आणि लहान चिमुकले हेच खरे माझे सवंगडी असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कठीण काळातही आत्मविश्वास ठेवा.
महात्मा गांधी