ब्रेकिंग न्यूज :
भारत

आमदार खताळांची तत्परता दहा लाख रू. मदतीचा धनादेश घरपोच;

Blog Image
एकूण दृश्ये: 143

आमदार खताळांची तत्परता दहा लाख रू. मदतीचा धनादेश घरपोच; मयत अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना शासनाची मदत

    संगमनेर भारत रेघाटे

एसटीपी भूमिगत गटार दुर्घटना प्रकरणातील मयत अतुल रतन पवार या तरुणा च्या आई-वडिलांना आ अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश घरपोच सादर केला आहे.

शहरातील कोल्हेवाडी रोड वर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटारीचे काम सुरू असतानाशहरातील कोल्हेवाडी रोड वर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटारीचे काम सुरू असताना १० जुलै २०२५ ला गटारीच्या चेंबरमधील मैला काढत असताना अतुल रतन पवार या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आ. अमोल खताळ यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी त्यांनी शासनाच्या वतीने ३० लाख रुपयांची मदत देणार असल्याचे लेखी पत्र दिले होते.

    आमदार खताळ यांच्या सूचनेनुसार संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी तत्काळ कार्यवाही करत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून १० लाख रुपयांचा मदतीचा धनादेश मयत पवार या कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन त्याच्या आई वडिलांकडे सुपूर्त केला. ही मदत मिळाल्याने पवार कुटुंबीयांनी आ. अमोल खताळ व नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले. उर्वरित रकमेची लवकरच पूर्तता करणार असल्याचे मुख्याधिकारी कोकरे यांनी सांगितले 

महायुती सरकार जाहिरात बाजी करणारे नव्हे तर काम करणारे 

शहरातील संजय गांधी नगर मधील मयत अतुल रतन पवार यांच्या कुटुंबियांना ३० लाख रुपयांपैकी पहिल्या टप्प्यातील १० लाख रुपयाचा धनादेश मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या कडून घरपोच देण्यात आला.उर्वरित रक्कम लवकरच कुटुंबियांना देण्यात येणार आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हे जाहिरातबाजी करणारे नव्हे तर काम करणारे सरकार असल्याचे खताळ म्हणाले. 

----- Advertisements -----

रियाज पिंजारीला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी आ खताळ  गटार दुर्घटना प्रकरणी मयत झालेल्या अतुल रतन पवार या तरुणाच्या नातेवाईकांना शासनाने 30 लाख रुपये देण्याचे जाहीर केले मात्र त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज पिंजारी याचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामुळे शासनाने त्यास मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून द्यावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी शुक्रवार दि ११ ला विधानसभेत करत या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले.

परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.

संत तुकाराम