ब्रेकिंग न्यूज :
भारत

आमदार खताळ यांच्या विरोधात महिलेची पोलिसात तक्रार ; माजी मंत्री थोरात यांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल

Blog Image
एकूण दृश्ये: 556

आमदार खताळ यांच्या विरोधात महिलेची पोलिसात तक्रार ; माजी मंत्री थोरात यांच्या स्वीय सहाय्यकावरही गुन्हा दाखल

   संगमनेर : भारत रेघाटे

आमदार अमोल खताळ यांना मारहाण केल्याच्या आरोपा खाली प्रसाद गुंजाळ यास चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे . माझ्या मुलाचे आर्थिक व्यवहारायुळे सदरचा प्रसंग घडला असून प्रसादची आई अनिता आप्पासाहेब गुंजाळ यांनी या घटनेत राजकारण आणू नये तसेच पुरावे सादर करत आमदार अमोल खताळ यांच्या विरोधात शहर पोलिसात तक्रार अर्ज दाखल केली आहे. तर या घटनेला चांगलेच राजकीय वळण मिळाले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्वीय सहाय्यकावरही गुन्हा दाखल झाला आहे.

घडलेल्या घटनाक्रमा मध्ये प्रसाद गुंजाळ याची आई अनिता गुंजाळ यांनीच आता शहर पोलिसात तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधला असला ते म्हणाले की प्रसाद त्याची आई अनिता यांनी तक्रार अर्ज दाखल केला असून याबाबत अधिक तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्या व्यक्तिगत आर्थिक व्यवहारातून संगमनेर शहरातील राजकारण चांगले ढवळून निघाले असून या घटनेला राजकीय रंग दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे. एकूणच संगमनेर शहरातली शांतता भंग पावलेली दिसून येत आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भोवती घडत असलेल्या अनेक संशयस्पद घटनांचा सत्य आणि वास्तुस्थितीदर्शक खुलासा होत नसल्याचे चित्र स्पष्ट होत नाही. चार दिवसांपूर्वी मारहाण करणाऱ्या तरुणाच्या आईने आता आमदार खताळ यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. आ. खताळ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर समर्थकांची सारवा सारव ? या घटनेशी आमचे संबंध तसेच प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी झालेले सर्व आर्थिक व्यवहार हे वैयक्तिक असून, आमदार अमोल खताळ यांचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. मात्र या व्यवहारांचा वापर राजकीय हेतूने केला जात असल्याने आम्हालाही कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा व्यवहार करणारे रवींद्र ज्ञानदेव देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिला आहे. मात्र प्रसाद गुंजाळ याने मित्र असलेल्या आमदार खताळ यांच्यावर हल्ला का केला ? या घटनेला राजकीय रंग दिल्या गेल्याने काही प्रश्न अनुत्तरित राहत असल्याचे दिसून येते.

----- Advertisements -----

माजी मंत्री थोरात यांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल ;

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर यांनी निवेदन सादर करत माझ्यावर शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला असल्याचे म्हटले आहे.  सदर घटनेशी आपला कोणताही संबंध नसून आपल्याला या घटनेत गोवण्यात आल्याचे भास्कर ठेवणार यांनी सांगितले. खेमनर म्हणाले की, मी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करतो. विविध कामांच्या निमित्ताने शेकडो फोन येत असतात, संगमनेर मध्ये घडलेल्या आमदार हल्ला प्रकरणातील आरोपीने मला 22 ते 25 तारखेच्या दरम्यान एक दोन वेळा फोन केले होते, त्याने मला 'साहेब कुठे भेटतील' एवढेच विचारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने मला काही व्हाट्सअप मेसेज केले होते. अनेक मेसेज मी वाचतही नाही. बघणे मला शक्य होत नाही. प्रसाद गुंजाळने काय पाठवले हे मला आजही माहित नाही. त्याच्या कोणत्याही मेसेजला माझ्याकडून उत्तर गेलेले नाही. मी प्रसाद गुंजाळ नावाच्या या व्यक्तीला ओळखतही नाही. आजवर कोणतेही बोलणे नाही. या घटनेशीही माझा दूरपर्यंत संबंध नाही. याप्रकरणी आता माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे मला समजले. या व्यक्तिगत व्यवहाराच्या प्रकरणाला राजकीय स्वरूप देण्याच्या दृष्टीने माझ्यावर हे षडयंत्र केले गेले आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा निरपेक्ष तपास करावा, त्यांना पाहिजे ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. मुळात हे संपूर्ण प्रकरण वैयक्तिक व्यवहाराचे असताना, त्यात राजकारण आणले गेले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी हा सर्व खेळ सुरू आहे. जनता सुज्ञ आहे आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास असल्याचे खेमनर म्हणाले.

यशस्वी माणूस तोच, जो प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहतो.

अज्ञात