ब्रेकिंग न्यूज :
भारत

आकाशात झेप , मन थरारून टाकणारे उड्डाण :

Blog Image
एकूण दृश्ये: 121

आकाशात झेप , मन थरारून टाकणारे उड्डाण : पॅराग्लायडिंग टेस्टने वेधले सर्वांचे लक्ष ;फ्लाइंग बर्ड अ‍ॅडव्हेंचर, तेजोमय अ‍ॅडव्हेंचरचे रोमांचकारी उड्डाण

        संगमनेर ( भारत रेघाटे ) 

आकाशात झेप घेत मुक्त पक्ष्यासारखे उड्डाण करीत दरीच्या हजारो फूट उंचीवरून दिसणारे निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य आणि त्यावर थराराची भर ! नजरेत भरणारे फ्लाइंग बर्ड अ‍ॅडव्हेंचर संगमनेर या टीमने नुकतेच चंदनापुरी घाट,जवळे बाळेश्वर परिसरात अशीच रोमांचकारी, यशस्वी पॅराग्लायडिंग टेस्ट सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

         पर्यटनाला नवे पंख देण्याचे स्वप्न घेऊन काम करणाऱ्या या टीमने तब्बल तीन साडेतीन हजार फूट खोल दरीत भव्य उड्डाण केले. १५ मिनिटांच्या या परफेक्ट फ्लाईट मध्ये थरार आणि रोमांच यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

        फ्लाइंग बर्ड अ‍ॅॅडव्हेंच, तेजोमय अ‍ॅडव्हेंचर टीम चंदनापुरीघाट, जवळे बाळेश्वर, पट्टा किल्ला, विश्रामगड, कळसुबाई, हरिश्चंद्रगड सारख्या दुर्गम व उंच ठिकाणी नियमितपणे नवीन लोकेशन्स शोधून उड्डाणे करत असल्याने साहसी पर्यटनाला नवचैतन्य मिळत आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण टीम हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग येथे अधिकृत प्रशिक्षण घेऊन सर्टिफाइड पॅराग्लायडर्स आहेत. 

----- Advertisements -----

      फ्लाइंग बर्ड अ‍ॅडव्हेंचरला तेजोमय अ‍ॅडव्हेंचर टीमची साथ मिळाल्याने ही मोहीम अधिक जोशात पार पडली. दरीतून वर झेपावताना त्यांच्या पॅराग्लायडर्सचा रंगीत पट आकाशात तरंगताना पाहून पर्यटक आणि स्थानिक मंत्रमुग्ध झाले. संगमनेर परिसरात साहसी पर्यटनाची नवी क्रांती घडविण्याचा निर्धार घेऊन ही टीम सातत्याने प्रयत्नशील आहे. या यशस्वी उड्डाणाने सर्व पायलट टीम संदीप देशमुख, आकाश देशमुख, आदेश शेळके, सुमीत देशमुख, संकेत घुगे, गिरीश घुगे,निलेश घुगे, जालिंदर मंडलिक, संदीप घुगे यांच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने आकाश मिळाले आहे.

उड्डाण करण्यापूर्वी सोबत एक दुसरी पॅराग्लायडिंग ठेवावी लागते. कारण एखाद्या पॅराग्लाइडिंगला काही प्रॉब्लेम आल्यास, हवेतच दुसरी पॅराग्लाइडिंग आपल्या सुरक्षेसाठी कामी येते. झेप घेतल्यानंतर परत आपल्या ठिकाणी येण्यासाठी कधीकधी पॅराग्लाइडिंग ही एखाद्या झाडाला अडकण्याची शक्यता असते. अशा वेळी खबरदारी घ्यावी लागते .त्यावेळी आपण सर्तकच राहीले पाहिजे असे पायलट पायलट टीम ने सांगितले.

शांतीसाठी संघर्ष करा, पण संघर्ष शांततेसाठीच असावा.

स्वामी विवेकानंद