ब्रेकिंग न्यूज :
भारत

कॅनलमध्ये पडून सोळा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Blog Image
एकूण दृश्ये: 449

कॅनलमध्ये पडून सोळा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत कुरणगाव हळहळले 

     संगमनेर ( प्रतिनिधी )

एकीकडे रंगपंचमी तर दुसरीकडे रोजे सुरू असताना तालुक्यातील कुरणगाव येथील कॅनलमध्ये पडून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घडली. रविवार दि. ८ मार्चला सायंकाळी चार ते साडे पाचच्या दरम्यान घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाजिद मोहसीन शेख (वय १६) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो मूकबधिर शाळेत  इयत्ता पाचवीत शिकत होता. कुरणगाव परिसरातील कॅनलजवळ असताना तो पाण्यात पडल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. वाजिद पाण्यात पडला हे आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला तात्काळ त्या ठिकाणी काही नागरिक एकत्र जमत बघ-याची गर्दी जमली होती. दरम्यान एका वकिलांनी पाण्यात उडी टाकून वाजिद यास बाहेर काढले. तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर तपासणी आणि पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु तत्पूर्वी वाजिद याचा मृत्यू झाला.

----- Advertisements -----

वाजिद याने रोजे पकडले होते आजचा 18 वा रोजाही सुरू होता. वाजिदच्या घरांमध्ये आई, वडील, दोन भाऊ, एक बहिण आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाजिद शेख यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घटनेबाबत शहर पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. वाजिदवर आज दि ८ लाख रात्री उशिरा अंतिम संस्कार ( दफन) करणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमच्या यशाचा पाया आहे.

अज्ञात
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin