ब्रेकिंग न्यूज :
भारत

छत्रपतींचे शिवरायाचे कार्य प्रेरणादायी ; आमदार सत्यजित तांबे

Blog Image
एकूण दृश्ये: 10

छत्रपतींचे शिवरायाचे कार्य प्रेरणादायी ; आमदार सत्यजित तांबे ; होय हिंदू ग्रुपच्या वतीने दुग्धाभिषेक  शिवजयंती उत्सवाची सुरुवात

  संगमनेर : ( प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाज तसेच अठरापगड बारा बलुतेदारांना सोबत घेऊन रयतेसाठी स्वराज्य उभे केले. बहुजनांचा राजा कसा असावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज होय. त्यांच्या राज्याभिषेकालाही त्या काळात अनेक अडथळे निर्माण करण्यात आले होते. मात्र आपल्या कार्याच्या बळावर त्यांनी छत्रपती पद प्राप्त करून इतिहासात अजरामर स्थान मिळविले. चारशे वर्षांनंतरही देशभरात प्रथम क्रमांकाने उच्चारले जाणारे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचे विचार आजही प्रेरणा देणारे आहेत, असे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले.

शिवजयंतीनिमित्त आयोजित दुग्धाभिषेक कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली.

----- Advertisements -----

यावेळी माजी शहर प्रमुख तसेच होय हिंदू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कानकाटे यांनी सांगितले की, गेल्या सतराअठरा वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त दुग्धाभिषेकाची परंपरा अखंडितपणे सुरू असून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचार हेच आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. कार्यक्रमाला संपर्क प्रमुख दिलीप साळगट, जिल्हा प्रमुख अमीत चव्हाण, माजी नगरसेवक कैलास वाघचौरे, विनायक गरूडकर, कैलास गायके आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम