ब्रेकिंग न्यूज :
भारत

नगर परिषदेचा विजय माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना गिफ्ट असणार ; दिलीप पुंड,

Blog Image
एकूण दृश्ये: 196

नगर परिषदेचा विजय माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना गिफ्ट असणार ; दिलीप पुंड,

संगमनेरच्या उज्ज्वल भविष्यासाठीच नव्या व्हिजनची मांडणी रॅलीला उदंड प्रतिसाद आज प्रचाराची सांगता

     संगमनेर ( प्रतिनिधी )

जनाधाराच्या विश्वासातूनच आपण सहा वेळ नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची जबाबदारी या मायबाप जनतेने विश्वासाने दिली. केवळ पद नव्हे, तर शहरात जागोजागी विकासातून बदल घडवण्याची संधी संगमनेर मधील तमाम जनतेने दिली आपण जनसेवक म्हणून समाजात वावरलो अशी भावना व्यक्त करत दिलीप पुंड यांनी संगमनेरच्या विकासाचा लेखाजोखा त्यांनी या मुलाखतीतून मांडला असून या निवडणुकीतील विजय हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना विजयाचे गिफ्ट देणार असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी दिली.

     संगमनेर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1-2 आणि 15 ब ची प्रचार सभेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचले असून संगमनेर 15 प्रभागां मधून तसेच नगराध्यक्षासह उमेदवार मोठ्या मोठ्या मताधिक्याने जास्तीत जास्त सीट घेऊन नगरपालिकेवर "सिंह" विजयाची डरकाळी फोडणार असल्याचा विश्वास दिलीप पुंड यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, प्रभागासह संपूर्ण शहराची रचना, सौंदर्यीकरण आणि सर्वांगीण विकासात "सिंहाचा" वाटा उचलण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आपण केला असेही पुंड म्हणाले. शहरासह प्रभागात स्वच्छ पाणीपुरवठा, गल्ली बोळात स्वच्छता, रस्ते, वृक्षारोपण, गार्डन प्रभागाघा दीर्घकालीन विकास अशी कामे प्राधान्याने राबवली गेली. आता उपनगरात भूमिगत गटारीसह शहरात रस्ते काँक्रीटीकरण अशी मूलभूत विशेष लक्षवेधी कामे या प्रभागात पूर्णत्वास नेणार आहोत.

   प्रभागात जातीधर्माचा कधीही तणाव न होता सामाजिक सलोखा व शांतता कायम राहिली; एकही अप्रिय घटना घडली नाही, ही संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाची ओळख असल्याचे त्यांनी खास नमूद केले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरची विकासात्मक वाटचाल घडत गेली. याच विचारसरणीतून नवे, कणखर नेतृत्व म्हणून आमदार सत्यजित तांबे हे संगमनेरकरांच्या गळ्यातील ताईत बनले असून, नगरपालिकेचे नेतृत्वही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एक नवे व्हिजन घेवून या शहराला दिशादर्शक बनवणार आहेत असा ठाम विश्वास पुंड यांनी व्यक्त केला. शहराला आता नव्या जोष असलेले युवका़चे चांगले चेहरे लाभणार असून, आता खऱ्या अर्थाने येथील कायापालट होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

     कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्षा म्हणून डॉ. मैथिली तांबेच आघाडीवर येणार असून एक सक्षम महिला म्हणून शहराच्या विकासाच्या अग्रभागी राहतील असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पुंड यांनी प्रशासकीय राजवटीवरही परखड टीका केली. प्रशासक हे जनतेचे सेवक असतात; मात्र मागील चार वर्षांत प्रशासनाकडून शहराकडे दुर्लक्ष झाले, विकासकामेच ठप्प पडली. नगरपालिकेचा कारभार विस्कळीत झाला असे त्यांनी ठामपणे सांगितले. प्रशासकांना जाब विचारणारे लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे; अन्यथा शहराच्या विकासावर मोठा आघात होतो, असा इशाराही त्यांनी दिला. हा प्रभाग माझ्यासाठी केवळ राजकीय क्षेत्र नाही, तर एक कुटुंब आहे. मित्र, बंधू भगिनी, नातेवाईकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि तो कायम राहील असे सांगत त्यांनी नमूद केले की, ही निवडणूक त्यांच्या राजकीय जीवनातील शेवटची असून शहराच्या सेवेसाठी आपण शेवटपर्यंत उभे राहू असे पुंड म्हणाले. आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेरसाठी दिलेले नवे, युवा चेहरे शहराला नवसंजीवनी देतील. या बळावर संगमनेर सेवा समिती नगरपालिकेत निश्चित विजय संपादन करेल आणि संगमनेरला वेगळ्या उंचीवर नेईल असा ठाम विश्वास दिलीप पुंड यांनी व्यक्त केला असून हा विजय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना गिफ्ट राहील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

----- Advertisements -----

 

 

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद