शिवजयंतीनिमित्त होय हिंदूच ग्रुपकडून दुग्धाभिषेक सोहळा ; १७ वर्षांची अविरत परंपरा ; सकाळी ७:३१ मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
संगमनेर ( प्रतिनिधी )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रणित “होय हिंदूच” ग्रुपच्या वतीने दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार दि. ६ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडणार आहे.
गेल्या सतरा ते अठरा वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे जपली जात असून शिवभक्त मोठ्या श्रद्धा व उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होत असतात. मराठी आणि हिंदू समाजाला स्वाभिमानाने, ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा दुग्धाभिषेक सोहळा साजरा केला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मा. शिवसेना शहरप्रमुख तथा होय हिंदूच ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांनी केले आहे.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी विनोद वाडेकर, कैलास गायके, नितीन पारखे, सागर ढेंबे, सागर कानकाटे, अक्षय भागवत, केशव वर्पे, किरण गुंजाळ, इरफान शेख, भाऊसाहेब धुमाळ, अनिकेत लिंगायत, अजय भागवत, संतोष दिवेकर, संतोष पुंड, रमेश गायकवाड, राहुल घाटकर, अजित वाकचौरे आदी सदस्य परिश्रम घेत आहेत.

