ब्रेकिंग न्यूज :
भारत

मान्यवरांच्या मांदियाळीत साहित्य कला मंच तर्फे कौतूक सोहळा

Blog Image
एकूण दृश्ये: 69

मान्यवरांच्या मांदियाळीत साहित्य कला मंच तर्फे कौतूक सोहळा ; ‘आदर्श वाचनालय सन्मानासह काव्यसंग्रह प्रकाशन व काव्यस्पर्धेतील विजेत्यांचा होणार गौरव

    संगमनेर (प्रतिनिधी) :

शहर आणि पंचक्रोशीत वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी कार्यरत असलेल्या साहित्य कला मंचातर्फे आदर्श वाचनालय सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत व्यापारी असोसिएशन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा तसेच संगमनेर सेवा समितीच्या संस्थापक मैथिली तांबे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्य कला मंचाचे संस्थापक संजय नवले व अध्यक्षा सुनिता घुले यांनी दिली. या सोहळ्यात मंचाचे कायदेशीर सल्लागार ॲड. सुभाष गोडगे यांच्या “झाकाळल्या नभात” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच आलेल्या ऑनलाइन काव्यस्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, वाचन संस्कृती जपणारे नागरिक व कवी लेखकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारभारी देव्हारे, नितीन वाकचौरे, अनिल चांडक, दर्शन जोशी, अकबर शेख, विजय पाटील, सागर पन्हाळे, प्रतिमा काळे, नम्रता दिघे, अर्चना ठुबे आदींनी केले आहे.

----- Advertisements -----

सुखाचे रहस्य समाधानात आहे.

संत ज्ञानेश्वर