ब्रेकिंग न्यूज :
भारत

विकासकामातून होणार कायापालट रविवारी भव्य सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांची उपस्थिती

Blog Image
एकूण दृश्ये: 48

विकासकामातून होणार कायापालट 

  रविवारी भव्य सोहळा

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांची उपस्थिती

   संगमनेर (प्रतिनिधी) 

तालुक्यातील चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि संगमनेर खुर्द परिसरात विकासाचा नवा अध्याय लिहिला जाणार असून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडणार आहेत. राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या दौऱ्यात परिसरातील विविध ठिकाणांची पाहणीही करणार असून स्थानिक विकासकामांचा आढावा घेणार आहेत.

चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावर सुमारे ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. या पुलामुळे वाहतुकीची कोंडी दूर होऊन शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

----- Advertisements -----

तसेच हिवरगाव पावसा येथे निळवंडे प्रकल्पाच्या उर्ध्व प्रवरा उजवा कालवा (सा. क्र. ३५७३०) येथे १ कोटी ३२ लाख रुपये खर्चाच्या सी.आर. कम एस्केप कामाचे लोकार्पण सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या उपक्रमामुळे कालव्याच्या पाण्याचे नियोजन अधिक सक्षम होऊन परिसरातील शेती सिंचनाला चालना मिळणार आहे.

याचबरोबर रायतेवाडी फाटा, संगमनेर खुर्द येथे नव्याने बसविण्यात आलेल्या पथदिव्यांचे लोकार्पण सायंकाळी ६.३० वाजता करण्यात येणार आहे. या पथदिव्यांमुळे रात्रीच्या वेळी वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास मदत होणार आहे.

एकूणच या सर्व विकासकामांमुळे संबंधित गावांच्या पायाभूत सुविधांमध्ये भरीव वाढ होणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण आहे. कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चंदनापुरी, हिवरगाव पावसा, रायतेवाडी व संगमनेर खुर्द येथील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.

संत तुकाराम