संगमनेर ( भारत रेघाटे)
संगमनेर तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढत असून जनावरे तसेच मानवी वस्त्यांजवळील हल्लाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कालवडी, शेळ्यांवर होणारे हल्ले आणि काही ठिकाणी लहान मुलांवर झालेल्या धोकादायक घटना चिंतेचा विषय ठरत आहेत.

मिर्जापूर येथे वन विभागा जवळ पाच सहा दिवसांपूर्वी परिसरात चार पाच पिंजरे लावलेल्या पिंजऱ्या पैकी एका पिंजऱ्यात एकाच वेळी दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला मंगळवार दि १७ सकाळी चार ते पाचच्या दरम्यान यश आले आहे.
एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे पकडण्याची घटना ही बहुतेक पहिल्यांदा घडली असेल. मात्र, दुसऱ्या पिंजऱ्यात ठेवलेले भक्ष बिबट्याने पळवून नेल्याची घटन घडली तसेच वलवे यांच्या वस्तीवर कालवडीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.

दरम्यान गायीने पाठलाग दाखवल्याने बिबटा पळून गेला. या दरम्यान दोन बिबटे पकडले असले तरी परिसरात अजूनही दोन तीन बिबट्यांचा वावर असल्याचे संकेत मिळत असून रात्रीच्या वेळी त्यांच्या डरकाळ्या ऐकू येत असल्याचे संपतराव वलवे सांगतात. त्यामुळे मिर्जापूर परिसरात दहशत पसरली आहे.
ग्रामस्थांनी वन विभागाकडे पिंजऱ्यांची संख्या वाढवणे, नियमित गस्त, तसेच रात्रीच्या वेळी अतिरिक्त खबरदारी उच्च क्षमता पिंजरे, प्रकाशव्यवस्था उभारण्याची मागणी वलवे यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने तातडीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.
संत एकनाथ