ब्रेकिंग न्यूज :
भारत

मराठी रंगभूमीला कोणी थोपवू शकणार नाही :- अभिनेते प्रशांत दामलेंनी ठणकावले म्हणाले ,नाटक आणि स्पोर्टस् एआय चे बाप

Blog Image
एकूण दृश्ये: 37

मराठी रंगभूमीला कोणी थोपवू शकणार नाही :-  अभिनेते प्रशांत दामलेंनी ठणकावले  म्हणाले ,नाटक आणि स्पोर्टस् एआय" चे बाप 

   संगमनेर ( प्रतिनिधी )

मराठी रंगभूमीवर आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनात चिऱतन घर करून आहे. येथील प्रेक्षक कलाकारांना आपल्या हृदयात जपतात असे मत ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी संगमनेर येथील कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या पाहणी प्रसंगी केले. प्रशासन, रसिक नागरिक आणि प्रसार माध्यमांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत रंगभूमीच्या सध्याच्या स्थितीवर स्पष्ट आणि थेट भाष्य त्यांनी केले.

ए आय तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव यावर ते म्हणाले. नाटक असो किंवा खेळ त्यांना थांबवण्याची ताकद कोणाकडे नाही. काही गोष्टी या प्रत्यक्ष अनुभवातूनच जगतात, त्या बनावट असू नयेत, असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी नाट्यसंस्कृतीच्या जिवंतपणावर भर दिला. दामले यांनी सांगितले की, कलाकृतींमध्ये जशा कमतरता असतात, तशाच काही उणिवा नाट्यगृहां मध्येही असतात मात्र जसे नाटक सुधारता येते, तसेच नाट्यगृहही सुधारता येणे शक्य आहे.

कवी अनंत फंदी नाट्यगृह खुले असताना येण्याचा योग आल्याची आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. संगमनेर रसिक प्रेक्षकांचे कौतुक करताना ते म्हणाले की, महाराष्ट्राची नाट्यपरंपरा अत्यंत समृद्ध आहे आणि पुणे मुंबईच्या मध्यवर्ती स्थानावर असलेले संगमनेर हे शहर नाट्य प्रयोगांसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरू शकते. “तांत्रिक बाबींमध्ये विशेषतः साऊंड सिस्टिमला अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे. कारण नाट्यगृह हे कलाकारांचे नव्हे, तर प्रेक्षकांचे घर असते,असे ते म्हणाले. 

----- Advertisements -----

राज्यातील नाट्यगृहांच्या दयनीय अवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर त्यांनी इच्छा शक्तीच्या अभावाकडे बोट दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांना निवेदन देऊन पायलट प्रोजेक्ट राबविण्याची गरज व्यक्त केली. महाराष्ट्रात सध्या ४६ नाट्यगृहे सुरू असून त्यापैकी किमान वीस नाट्यगृहांचे आधुनिकीकरण अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नव्याने पाच नाट्यगृहांची उभारणीही प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली.

विकासकामांच्या फायली हरवण्याच्या प्रकारावर उपरोधिक टोला लगावत त्यांनी प्रशासनालाही जबाबदारीची जाणीव करून दिली. उदयन्मुख कलाकारांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, या क्षेत्रात येताना स्वतःच्या क्षमता ओळखून सातत्यपूर्ण सराव आणि अभ्यास आवश्यक तसेच. स्पर्धा प्रचंड आहे. टिकून राहण्यासाठी अभिनय अधिक परिष्कृत करावा लागेल, असे ते म्हणाले. मराठी नाटकाचा प्रेक्षक अत्यंत जाणकार असल्याने नाटकाची संहिता जपली गेली तर नाटक यशस्वी ठरते असे ते म्हणाले‌.चार दशकांच्या अनुभवाचा दाखला देताना दामले म्हणाले प्रिंट मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये झालेला बदल हा अनुभव आजही घेतो तो पाठीशी आहे.

यावेळी आमदार सत्यजित तांबे यांच्या कार्याचे कौतुक करत, संगमनेरला दिशा देणारा जबाबदार आमदार लाभल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. श्रीराम लागू हे आपले नाट्यसृष्टीतले गुरू होते. 'परमेश्वराला रिटायर करा' असे ते नेहमी म्हणत असत. याबाबत आपले मत काय ? ते म्हणाले की, गुरूंचे विचार हे मार्गदर्शक असतात; मात्र प्रत्येकाला स्वतःची वैचारिक मतं आणि भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. लागू यांचे ते व्यक्तिगत मत होते. तसे माझे यावर मत असे काही नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कवी अनंत फंदी नाट्यगृहाची पाहणी करून या ठिकाणी अनेक उपाय योजना आणि भविष्यातील शक्यता वर्तवत आपले अनुभव सांगत सुधारणा करण्यास. सूचित केले नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, प्रशासकीय अधिकारी संजय पेखले, अध्यक्ष संजय दळवी, डॉ. सुनील चव्हाण, डॉ. रवींद्र गायकवाड, अविनाश सूर्यवंशी यांच्यासह स्थानिक कलाकार व नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----- Advertisements -----

शिकत रहा, कारण ज्ञान हेच आपले खरे सामर्थ्य आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर