ब्रेकिंग न्यूज :
भारत

अभ्यासासाठी विश्वासाने दिले घर, त्याच घरात कट; नातेवाईकाचा मुलगा,मित्रांनी साडे नऊ लाखांचे दागिने केले लंपास, पाच जण ताब्यात देवकौठे येथील घटना

Blog Image
एकूण दृश्ये: 211

अभ्यासासाठी विश्वासाने दिले घर, त्याच घरात कट; नातेवाईकाचा मुलगा,मित्रांनी साडे नऊ लाखांचे दागिने  केले लंपास, पाच जण ताब्यात

    संगमनेर : ( प्रतिनिधी )

विश्वासाला तडा देणारी खळबळजनक घटना देवकौठे (ता. संगमनेर) येथे  उघडकीस आली आहे. अभ्यासासाठी नातेवाईकाच्या मुलासह त्याच्या मित्रांना घरात राहण्यास दिलेल्या घरमालकाचा विश्वासघात करत तब्बल ९ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास करण्यात आली. तालुका पोलिसांच्या सखोल तपासात ही चोरी बाहेरून नसून घरात राहणाऱ्या युवकांनीच केली असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात २२ ते ३२ वयोगटातील पाच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामध्ये मंगेश किसन गुडघे (देवकौठे) मुकुंद प्रकाश दिघे (सोनगाव लोणी) श्रेयस विजय सत्रे, सत्यम प्रकाश दहिवळकर आणि विलास रामदास आदापुरे हे तिघेही (राहुरी) येथील रहिवासी असून यांचाही समावेश आहे. हा प्रकार २२ ऑक्टोबर ते २८ डिसेंबर या कालावधीत घडला असून, ६ फेब्रुवारी रोजी चोरी झाल्याचे लक्षात आले. 

तक्रारदार सुनील वसंत गुडघे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि तहसील पोलीस निरीक्षक प्रवीण सालुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस महेश शिंदे करीत असून त्यांनी पाचही आरोपींची कसून चौकशी केल्याने या पाचही जणांनी चोरी केल्याची तसेच यामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली.

----- Advertisements -----

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin