ब्रेकिंग न्यूज :
भारत

एलसीबीचे पोलीस कर्मचारी बडतर्फ ; अपहार व अंमली पदार्थ तस्करीत सहभाग

Blog Image
एकूण दृश्ये: 493

एलसीबीचे पोलीस कर्मचारी बडतर्फ ; अपहार व अंमली पदार्थ तस्करीत सहभाग 

   अहमदनगर ( प्रतिनिधी )

पोलीस खात्याची शिस्त आणि विश्वास धुळीस मिळवणारा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर  एका पोलीस कर्मचाऱ्यांस सेवेतून थेट बडतर्फीची कडक कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

तपासादरम्यान अपहार, फसवणूक तसेच अंमली पदार्थ तस्करीत प्रत्यक्ष सहभाग आढळून आल्याने  १८ जानेवारी रोजी शिरूर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे एनडीपीएस कायदा कलम ८(ब), २१ (क) अंतर्गत श्यामसुंदर विश्वनाथ गुजर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन गुर्जर यांना अटक करण्यात आली होती.

याबाबत वैद्यकीय तपासणी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अहवालातून गंभीर निष्कर्ष समोर आल्यानंतर तोफखाना पोलीस अहिल्यानगर येथे भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६ (५), ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात अंमली पदार्थ तस्करीत थेट सहभाग स्पष्ट झाल्याने कारवाईचा फास आवळण्यात आला. या सर्व गंभीर गैरप्रकारांची दखल घेत सखोल चौकशीनंतर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२)(ब) अन्वये शासन सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे दिला आहे.

 

----- Advertisements -----

 

परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.

संत तुकाराम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin