ब्रेकिंग न्यूज :
भारत

संगमनेरच्या लोककलेचा राष्ट्रीय गौरव ; पद्मश्री खेडकरांचा नागरी सत्कार ; लोकनेते थोरात, विचारवंत डॉ. कसबे यांची उपस्थिती गौरव समितीचे आग्रहाचे आमंत्रण ; नाट्य भूमी संगमनेरचे गायले जाणार कोडकौतूक

Blog Image
एकूण दृश्ये: 41

संगमनेरच्या लोककलेचा राष्ट्रीय गौरव ; पद्मश्री खेडकरांचा नागरी सत्कार ;लोकनेते थोरात, विचारवंत डॉ. कसबे यांची उपस्थिती

( गौरव समितीचे आग्रहाचे आमंत्रण ; नाट्य भूमी संगमनेरचे गायले जाणार कोडकौतूक )

   संगमनेर ( प्रतिनिधी )

लोककला, संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या तालुक्याचे भूषण आणि प्रसिद्ध लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील सर्वपक्षीय नेतृत्व व समस्त नागरिकांच्या वतीने रविवार, दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे भव्य नागरी सन्मानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे माजी महसूल व शिक्षणमंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात भूषविणार असून, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांच्या शुभहस्ते रघुवीर खेडकर यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. तांबे म्हणाले की, स्व. कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांनी तमाशा लोककलेच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे, तर देशभर पोहोचवले. आयुष्यभर लोककलेसाठी झटणाऱ्या रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून, संपूर्ण संगमनेर तालुक्याच्या सांस्कृतिक योगदानाचा गौरव आहे.

या भव्य सोहळ्यास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, दुर्गा तांबे, नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह विविध संस्था, संघटना, सामाजिक सांस्कृतिक व सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, कला व क्रीडा रसिक, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

----- Advertisements -----

लोककलेचा सन्मान करणाऱ्या या ऐतिहासिक नागरी सत्कार सोहळ्या निमित्त संगमनेरमधील सर्व कला रसिकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रघुवीर खेडकर गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

यशस्वी माणूस तोच, जो प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहतो.

अज्ञात