ब्रेकिंग न्यूज :
भारत

डिलिव्हरी न होता ‘डिलिव्हर्ड’चे मेसेज! भारत गॅसचा अजब गजब कारभार ग्राहक त्रस्त, नित्याचीच डोकेदुखी गॅस टाक्यांचे गोड बंगाल

Blog Image
एकूण दृश्ये: 136

डिलिव्हरी न होताच ‘डिलिव्हर्ड’चे मेसेज! भारत गॅसचा अजब-गजब कारभार; ग्राहक त्रस्त, नित्याचीच डोकेदुखी गॅस टाक्यांचे गौड बंगाल

     संगमनेर  ( प्रतिनिधी )

गॅस वितरण सेवा म्हणजे दिलासा नव्हे, तर डोकेदुखीच ठरत असल्याचे चित्र सध्या भारत गॅस एजन्सीच्या कारभारातून समोर येत आहे. सिलेंडर घरपोच न पोहोचताच मोबाईलवर मात्र ‘डिलिव्हरी पूर्ण’ झाल्याचे मेसेज सातत्याने येत आहेत. प्रत्यक्षात सिलेंडरचा पत्ता नाही, डिलिव्हरीचा मागमूस नाही; मात्र व्यवहार पूर्ण झाल्याचे दाखवले जाते. या खोट्या मेसेजांच्या माऱ्यामुळे ग्राहक अक्षरशः हैराण झाले आहेत.

मागील काही काळात सिलेंडर तुटवड्याचा बागुलबुवा उभा करून काळाबाजाराच्या कुजबुजाही सुरू होत्या. घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा भासवला जात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मध्यंतरी महिलावर्ग संतप्त झाला, घराघरांतून तक्रारींचा सूर उमटला; तरीही व्यवस्थेत कोणतीही ठोस सुधारणा दिसून आलेली नाही. आता तर कळस गाठला आहे—सिलेंडर मिळाल्याचे मेसेज येतात, डिलिव्हरी पूर्ण दाखवली जाते; पण प्रत्यक्षात सिलेंडर घरपोच होतच नाही. हा प्रकार म्हणजे सरळसरळ ग्राहकांची फसवणूक नव्हे तर काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

----- Advertisements -----

एजन्सीचा हा हलगर्जीपणा असह्य असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. वारंवार तक्रारी करूनही काडीचीही सुधारणा होत नसणे, हीच खरी शोकांतिका ठरत आहे. याबाबत भारत गॅस एजन्सीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. सिलेंडर डिलिव्हरी झाल्याचे दाखवून प्रत्यक्षात ग्राहकाला न दिल्यास हा बोगस कारभारच ठरतो. डिलरकडून ‘डिलिव्हर्ड’चे मेसेज येत असतील, तर सेवा देखील त्याच पद्धतीने मिळणे अपेक्षित आहे; मात्र तसे होताना दिसत नाही. अनेक ग्राहक आपल्या व्यस्ततेमुळे या मेसेजांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यातून आर्थिक व्यवहारातही फसगत तसेच सिलेंडर अफरातफर होण्याची शक्यता नाकारता येत नाही सरकारने प्रत्येक ग्राहकास सिलेंडरचा कोटा निर्धारित केलेला असतो  ग्राहकाच्या नावावर नोंदणी झालेले सिलेंडर ग्राहकाला न मिळता ते परस्पर विक्री केले जातात का असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला असून हा नेमका काय प्रकार आहे असा सवालही ग्राहक करीत आहेत.

प्रशासन आणि संबंधित कंपन्यांनी याची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्राहकांकडून होत आहे. याबाबत पुरवठा अधिकारी रसिक सातपुते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चौकशी करून त्याचे निराकरण करण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल .तसेच असे प्रकार घडू नये यासाठी तहसीलदारांमार्फत नोटीस काढू असेही ते म्हणाले.

शिक्षणाशिवाय जीवन अधू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin