ब्रेकिंग न्यूज :
भारत

‘माफ करा दादा!’ चर्चेचा विषय बनला ; कायदा सुव्यवस्था ऐरणीवर ; धारदार पात्याचा कोयता हवेत फिरवून दहशत

Blog Image
एकूण दृश्ये: 214

माफ करा दादा!’ चर्चेचा विषय बनला ; कायदा सुव्यवस्था ऐरणीवर ; धारदार पात्याचा कोयता हवेत फिरवून दहशत

    संगमनेर (प्रतिनिधी)

शहरात दिवसेंदिवस दहशत निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असून, दिवसा ढवळ्या कोयता घेऊन स्टंटबाजी करण्याचे प्रकार नागरिकांच्या चिंतेत भर घालत आहेत. हातात धारदार कोयता दिसताच शहरात भीतीचे सावट पसरत असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

धारदार पात्याचा चक्राकार कोयता हवेत घुमवत दहशत माजवणाऱ्या फारुख इसाक शेख (वय 28, रा. संगमनेर खुर्द) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना 30 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता घडली. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करत संबंधित तरुणाला संगमनेर खुर्द येथील त्याच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेतले. त्याच्याकडील कोयता पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. शस्त्र कायदा कलम 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस राहुल पांडे यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतल्यानंतर संबंधित तरुणाने, मी कोयता घेऊन फिरत होतो, दहशत करत होतो. पोलिसांनी मला पकडले आहे. आता पुन्हा असे करणार नाही. माफ करा दादा, असे म्हणत माफी मागितली. पोलिसांनी त्याला समज देत माफीवर सोडून दिल्याची घटना सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. 

----- Advertisements -----

कठीण काळातही आत्मविश्वास ठेवा.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin