ब्रेकिंग न्यूज :
भारत

विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, विविध धार्मिक कार्यक्रमासह संघटनात्मक दिशा देणारे आगळे वेगळे उपक्रम

Blog Image
एकूण दृश्ये: 54

विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, विविध धार्मिक कार्यक्रमासह संघटनात्मक दिशा देणारे आगळे वेगळे उपक्रम

 छत्रपती संभाजीनगर  (प्रतिनिधी)

विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्य तर्फे माघ शुक्ल त्रयोदशी ३१ डिसेंबर २०२६ ला प्रभु विश्वकर्मा प्रकट दिनाच्या निमित्ताने विश्वकर्मा प्रतिमा मूर्ती पूजन तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा कार्यक्रमाने हा प्रकट उत्सव मोठ्या धुमधडाक्यात संपूर्ण भारतभर साजरा होत आहे. तरुण पिढीला सामाजिक जाणीव, चेतना आणि संघटनात्मक दिशा देणारा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १५ ते २५ वयोगटातील तरुण युवक युवतींसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, हा उपक्रम तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी ५ मिनिटांचा व्हिडिओ तयार करून खालीलपैकी एका विषयावर आपले विचार मांडायचे आहेत.

१) महाराष्ट्रातील विश्वकर्मा वंशीय सुतार, लोहार, सोनार, तांबट, पाथरवट समाजाची सद्यस्थिती व संघटनाचे महत्त्व.

२) विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वाढीसाठी तरुणांकडून काय अपेक्षा आहेत ?

3) स्पर्धेचा शुभारंभ २८ जानेवारी २०२६ पासून झाला असून, स्पर्धक १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपले व्हिडिओ ऑनलाईन पद्धतीने पाठवू शकतात. स्पर्धेचा निकाल १५ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर केला जाणार आहे.

स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ७,००१ रुपये, द्वितीय बक्षीस ५,००१ रुपये, तर तृतीय बक्षीस ३,००१ रुपये ठेवण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार असून, विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. ही स्पर्धा फक्त लोहार, सुतार, तांबट व पाथरवट या पाच विश्वकर्मा वंशीय समाजातील स्पर्धकांसाठीच खुली आहे.

----- Advertisements -----

स्पर्धेच्या आयोजनासाठी संघटनेचे संस्थापक नागोराव पांचाळ, प्रदेशाध्यक्ष सचिन सुतार, राज्य कार्याध्यक्ष अरुण भालेकर, राज्य सरचिटणीस संजय सुतार यांच्यासह राज्य व विभागीय पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ऑनलाईन नोंदणी व व्हिडिओ पाठवण्यासाठी स्पर्धकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्य तर्फे समाजबांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, प्रभु विश्वकर्मा प्रकट दिन साजरा करताना डीजे रॅली, बँड पथक किंवा मिरवणुका काढू नयेत. धार्मिक परंपरेनुसार कीर्तन, भजन, पूजा मंदिर, हॉल किंवा मंडपातच पार पाडाव्यात, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. तसेच समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या छायाचित्रास श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य आवश्यक आहे.

सावरकर