ब्रेकिंग न्यूज :
भारत

झेंडा फडकला ; पण,अधिकारी फिरकलेच नाहीत! प्रजासत्ताक दिनीही प्रशासनाला प्रजेकडे पाहायला वेळ नाही का ? उपोषणाची दिशा तीव्र करणार

Blog Image
एकूण दृश्ये: 599

झेंडा फडकला ; पण,अधिकारी फिरकलेच नाहीत! प्रजासत्ताक दिनीही प्रशासनाला प्रजेकडे पाहायला वेळ नाही का ? उपोषणाची दिशा तीव्र करणार 

   संगमनेर : (प्रतिनिधी )

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधान, न्याय आणि प्रजेच्या हितासाठी लोकशाहीची गाणी गायली जातात. पण प्रत्यक्षात न्यायासाठी उपोषणाला बसलेल्या नागरिकाकडे पाहायलाही प्रशासनाला वेळ नाही, हीच शोकांतिका संगमनेरमध्ये उघड झाली आहे.

         वडगाव पान येथील आपल्या अतिक्रमित जमिनीच्या ताब्यासाठी लढा देणारे गणेश रासने यांनी २६ जानेवारी रोजी सहकार महर्षी क्रीडा संकुल येथे कुटुंबासमवेत उपोषण केले. मात्र झेंडावंदन झाले, भाषणे झाली, फोटोसेशन झाले. आणि अधिकारी मात्र फिरकलेच नाहीत!

           हाच का प्रजासत्ताक दिन ? हाच का लोकशाहीतील न्याय ? आदेश आहेत, मोजणी झाली, तरीही कारवाई शून्य. पीडीत गणेश रासने यांच्या मालकीची वडगाव पान येथील स.नं. 13/1 (0.61 आर) जमीन असून त्यातील सुमारे 17 आर क्षेत्रावर जनार्दन गायकवाड व इतरांनी अतिक्रमण केल्याचे अधिकृत मोजणीत स्पष्ट झाले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्याचे थेट आदेश दिले. पोलिस बंदोबस्तही मंजूर झाला. पंचनामे झाले. मग प्रश्न असा आहे की पुढे कारवाई का होत नाही ?

         प्रशासन नेमकं कुणासाठी काम करतंय ? समनापूर मंडळाधिकारी आणि तहसील कार्यालयाकडून केवळ उडवा उडवीची उत्तरे दिले जातात. असा गंभीर आरोप रासने यांनी केला आहे. उपोषण करूनही न्याय मिळत नसेल, तर आता संघर्षाची दिशा बदलणार असल्याचे रासने यांनी सांगितले. 

----- Advertisements -----

 

संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराज