संगमनेरच्या तरुणांचे भवितव्य धोक्यात! अंमली पदार्थांची साखळी उघड, दोन फरार आरोपी जेरबंद
संगमनेर ( प्रतिनिधी)
शहरातील तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणाऱ्या अंमली पदार्थांच्या रॅकेटवर अखेर पोलिसांनी जोरदार घाव घातला आहे. अप्पर अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्या संयुक्त कारवाईत संगमनेर शहर पोलीसात ठ एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8 ( क ) नुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ रोजी पहाटे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यातील फरार आरोपी मोहम्मद साद शेख (२४), रा. भारतनगर, संगमनेर हा सध्या संगमनेरमध्येच असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भारतनगर परिसरात छापा टाकत साद शेख याला अटक केली. तपासात आणखी एक आरोपी रेहान शेरखान पठाण ( १९ ) रा. वडाळा, नाशिक याचा सहभाग निष्पन्न झाला. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, डॉ कुणाल सोनवणे कार्यालयाच्या पथकाने नाशिक येथे शोधमोहीम राबवून त्यालाही ताब्यात घेतले. ही कारवाई म्हणजे संगमनेरमधील वाढत्या नशेच्या बाजारावरच घाला घालत थेट वार केला आहे. शहरातील तरुणाईच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना पोलिसाचा कडक इशारा गरजेचा आहे
सदर कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि डीवायएसपी डॉ .कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे, सुनील ढाकणे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पगारे करीत असून शहरात नशेचे जाळे कुठवर पसरले आहे ? अजून किती तरुण बळी पडणार ? प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर संगमनेरचे भवितव्य धोक्यात जाण्यास वेळ लागणार नाही हे तितकेच खरे.
