एक पर्व शमले; ज्येष्ठ शिवसैनिक केसेकर अनंतात विलीन ; महाकाय अशा जनसागराने केला नायकाला अखेरचा जय महाराष्ट्र
संगमनेर ( प्रतिनिधी )
झाले बहु, होतील बहु; परंतु या सम हा ! हे केकावलीकारांचे वाक्य केसेकरांच्या व्यक्तिमत्त्वाला तंतोतंत जुळते. समाजाप्रती निष्ठा, विचारांप्रती प्रामाणिकपणा आणि 'हिंदुत्वाची धग' या त्रिसूत्रीवर उभे राहिलेले त्यांचे आयुष्य म्हणजेच एक पर्व होते. असा एक धगधगता निखाऱाच एका प्रचंड ज्वालामुखीने कधीही न सुटणाऱ्या अजस्त्र अशा आपल्या कवेत सामावून घेतले आहे. 'आप्पा' नावाचा हा निखारा आता त्या पचत्वात एकरूप झाला असला, तरी त्यातून निर्माण झालेली ऊर्जा भविष्यातही असंख्य शिवसैनिकांच्या धमण्यांतून सदैव उसळत राहील.

नवनिर्मिती हा निसर्गाचा नियम आहे, पण असा सर्ग पुन्हा क्वचितच होतो. व्यक्ती निसर्गात विलीन होतो, तर त्यांचे कार्य चिरकाल, चिरंतन राहतं. आप्पा नावाची व्यक्ती तुम्हा आम्हाला कायमचीच सोडून गेली, परंतु त्यांची प्रेरणा अजरामर झाली. कैलास केसेकर हे नाव पंचक्रोशीतील इतिहासाची पाने होते. तो काळ संपला नव्हे, हे पर्व काळझोपेत निद्रिस्त अवस्थेत लीन झाले. अमर रहे! अमर रहे ! म्हणत अखेरचा जय महाराष्ट्रचा नारा या असंमताला भेदला.

विचारक असलेल्या तत्वाची संगत करत पुन्हा त्याच उमेदीने हा भगव्याचा ध्वज त्यास दिद्गिगंत फडकण्यासाठीच ! इथे असलेल्या अनेक अबाल वृद्ध तसेच युवा वर्गांच्या रोमा रोमात चैतन्यमयी आठवणीचा प्रेरणेचा स्त्रोत तीच तुमची आमची संगत करेल. खरे तर आप्पांमुळेच आम्ही कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक घडलो अशी भावना आज असंख्य कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंनी व्यक्त होत होती. संगमनेर तालुक्याचे धर्मवीर, निष्ठेचे प्रतीक आणि शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी जिल्हा उपप्रमुख कैलास उर्फ आप्पा मुरलीधर केसेकर नावाच्या नायकाच्या जाण्याने संगमनेर तालुक्यातील शिवसेनेचा एक तेजस्वी अध्याय संपला आहे.
संघर्ष काय असतो ? असाच मृत्यु सोबत चाललेला दोन महिन्याच्या संघर्षानंतर अखेर मृत्यूने त्यांना गाठलेच. मात्र मृत्यूशी झुंज देणारा हा लढवय्या शिवसैनिक काळझोपेत चिरनिद्रीस्त झाला. कैलास (आप्पा) केसेकर हे नगरपालिकेचे पहिले शिवसेना नगरसेवक म्हणून इतिहास घडवणारे व्यक्तिमत्त्व होते. ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. शिवसेनेच्या संघर्षमय काळात पक्षाची धग स्वतःच्या अंगावर झेलत संघटन मजबूत करणारा हा कणा होता. आपल्या प्रभागात भगवा फडकत ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले.

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अढळ निष्ठा ठेवणारे, त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून आयुष्य जगणारे, निर्भीड आणि ठाम मताचे व्यक्तिमत्त्व म्हणून कैलासशेठ केसेकर सर्वश्रुत होते. या भगव्या कवचावर नगर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी दिग्गज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या आठवणी शिवसैनिकांना कायम प्रेरणा देत राहील.
