ब्रेकिंग न्यूज :
भारत

अखेर तो धागा सापडला !

Blog Image
एकूण दृश्ये: 295

अखेर तो धागा सापडला !

         संगमनेर प्रतिनिधी

शहरात मकरसंक्रांतीच्या पतंगोत्सवाला चायना व नायलॉन मांजाने रक्तरंजित वळण दिले आहे. आनंदाच्या नावाखाली अनेकांना जखमी करण्याचे खेळ सुरू असून, या घातक मांजामुळे छोटे मोटे अपघात, गंभीर जखमा देणा-या घडत आहेत. तरीही शहरात नायलॉन मांजाच मिळत नसल्याचा कांगावा केला जात होता. प्रत्यक्षात मात्र रस्ते, झाडे, तारा, सार्वजनिक ठिकाणी नायलॉन मांजाचे पुंजके सापडत होते. मग हा बंदीचा मांजा आलच कुठून ? हा प्रश्न नागरिकांना सतावत असतानाच अखेर मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. बंदी असलेला नायलॉन मांजा शहरातील काही भागात रस्य्यावर पडलेले पुंजके आढळून आले.

शहरात चोरीछुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याचे संकेत आहेत. मात्र यावर कारवाई अपुरी ठरत आहे. या धोकादायक मांजामागचा मुख्य पुरवठादार, सूत्रधार मोकाट कसे? जोपर्यंत विक्रेत्याची साखळी उद्ध्वस्त होत नाही, तोपर्यंत संगमनेरकरांचे प्राण धोक्यातच राहणार आहेत. दुर्घटना घडूनही विक्रेता आणि पतंगाचा आनंद घेत तो उडवणाऱ्यांवर कारवाई का झाली नाही ? असा प्रश्न उभा राहिला आहे.

शहरात चायना मांजाची विक्रीच होत नाही असा दावा केला जात असताना, मग रस्त्यांवर सापडणारे नायलॉन मांजाचे पुंजके आले तरी कुठून ? हा प्रश्न संशय निर्माण करणारा ठरत आहे. नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या घातक धागा विक्रेत्यावर कठोर कारवाई होणार की पुन्हा दुर्लक्ष केले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

----- Advertisements -----

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin