ब्रेकिंग न्यूज :
भारत

गल्लीबोळासह सगळीकडे श्वानराज ; चोरांच्या दहशतीसह आता कुत्र्यांची दहशत, नागरिकांच्या जीवाशी खेळ

Blog Image
एकूण दृश्ये: 341

गल्लीबोळासह सगळीकडे  श्वानराज ; चोरांच्या दहशतीसह आता कुत्र्यांची दहशत, नागरिकांच्या जीवाशी खेळ 

    संगमनेर ( प्रतिनिधी)

शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली असून जणू हा प्रश्नच हाताबाहेर गेला की काय अशी अवस्था झाली असून चोरट्यांबरोबर कुत्र्याची ही दहशत सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. गल्लीबोळ, चौक, बाजारपेठा, मुख्य रस्ते कुठेही नजर टाका, टोळक्याने फिरणारी कुत्र्यांची झुडच समोर उभी ठाकलेली दिसते. विशेषतः आक्रमक कुत्र्यांचे घोळके एकत्र येऊन रस्त्यावरच भांडणे, अचानक हल्ले करत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले धोक्यात आली आहेत.

रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांवर दबा धरून अंगावर धावणे, दुचाकी चारचाकींच्या मागे गाडीवर धवत झडप घालणे तर अनेक ठिकाणी थेट चावा घेण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी, काही नागरिकांना कुत्र्यांनी चावल्याने ग्रामीण व खासगी रुग्णालयात धावपळ करावी लागली आहे. डॉग बाईट हा जीवघेणा ठरू शकतो, हे वास्तव असतानाही प्रशासनाची ढिसाळ भूमिका नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे.

चंद्रशेखर चौक, घास बाजार, आदि परिसरात तर जणू कुत्र्यांचा बाजार भरल्याचे अथवा श्वानाचे पथक अवतरल्या सारखे दृश्य रोज दिसते. मोठ्या संख्येने श्वानांचे टोळके रस्ते अडवून बसतात वाहतूक ठप्प, नागरिक भयभीत! नगरपालिके कडून अधूनमधून कारवाई झाल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थेच आहे. एकूणच शहर व उपनगरात कुत्र्यांची दहशत सर्वत्र असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नगरपालिकेने तात्काळ, प्रभावी आणि कायमस्वरूपी कारवाई करावी, भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

----- Advertisements -----

चोरट्यांच्या दहशतीनंतर आता शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. ज्या ठिकाणी नियमित बाजार भरतो, तेथे महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची मोठी वर्दळ असते. जवळच शाळा असल्याने मुलांची ये जा सुरू असते. मात्र कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकदा महिला ज्येष्ठ नागरिकांना मुलांना शाळेत सोडण्यासाठी जावे लागते, पण कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भीतीने महिला असुरक्षित आहेत. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ