कोल्हापुरात डॉ. घोसाळेंचा होणार सन्मान
संगमनेर ( प्रतिनिधी )
येथील आंबेडकरी व धम्म चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र विठ्ठल घोसाळे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल युवा बौद्ध धम्म परिषद कोल्हापूर (महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र) या संस्थेच्या वतीने भंते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या १० व्या युवा धम्म परिषदेच्या विशेष कार्यक्रमात डॉ. रवींद्र घोसाळे यांना प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या निवडीने संगमनेर, अकोले तालुक्यासह राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या पुरस्कारामुळे डॉ. घोसाळे यांना मानणाऱ्या देशभरातील मित्रपरिवारात आणि अनुयायांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सामाजिक कार्यास नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

