अभियंता श्याम मिसाळ या़ंचा 'प्राइड ऑफ नेशन' पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते गौरव
अहिल्यानगर ( भारत रेघाटे)
स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय आणि दर्जेदार कामगिरी करत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात आपली स्वतंत्र छाप पाडणारे अभियंता श्याम मिसाळ यांना यांच्या कामगिरीला राष्ट्रीय प्रतिष्ठेचा प्राइड ऑफ नेशन हा नामांकित पुरस्कार राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या हस्ते एक्सलन्ट इंजिनिअर हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला आहे.
मुंबई येथे प्रदान करण्यात आला. त्यांच्या बहुमोल योगदानाचा गौरव करत निवडक आणि गुणवंत अभियंत्या मध्ये त्यांची निवड झाली.
अभिनंया श्याम मिसाळ हे संगमनेर येथून पदोन्नतीवर अहिल्यानगर येथे कार्यकारी अभियंता तसेच शहर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. मिसाळ यांची शैक्षणिक वाटचाल अत्यंत भक्कम असून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीतील पदविका, पदवी आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तसेच सी डॅक संस्थेतून संगणक प्रणाली विषयातील विशेष पदविका घेत त्यांनी तांत्रिक ज्ञान अधिक सक्षम केले.
आपल्या दीर्घ सेवाकाळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना नवे बळ दिले आहे.नाशिक विमानतळ विकास, ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवरील अत्याधुनिक विक्रीकर भवन,औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उभारणी प्रकल्प, राज्यमार्ग व जिल्हामार्गांचे दर्जेदार बांधकाम, तसेच मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पातील महत्वपूर्ण सहभाग आहे.
या सर्व कामांमध्ये मिसाळ यांची कुशल, दूरदर्शी आणि प्रामाणिक कार्यशैली स्पष्ट जाणवते. त्यांच्या उत्कृष्ट कार्यगिरीबद्दल इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (कोलकाता) नाशिक शाखेसह अनेक संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे. कोल्हार बु. येथील रहिवासी असलेले श्याम मिसाळ हे अभ्यासू, तळमळीने काम करणारे आणि सचोटीने जबाबदाऱ्या पार पाडणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे विभागात अभिमानाची भावना व्यक्त करण्यात येत असून, मिसाळ यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
