ब्रेकिंग न्यूज :
भारत

राज्यात चाललेला धुमाकुळ चिंताजनक, अमली पदार्थ व हिंसाचाराला थारा नाकोच; :- माजी मंत्री थोरात न. पा. १६० वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेले संगमनेर आता पुढील विकास टप्प्याकडे

Blog Image
एकूण दृश्ये: 97

राज्यात चाललेला धुमाकुळ चिंताजनक, अमली पदार्थ व हिंसाचाराला थारा नाकोच; :- माजी मंत्री थोरात

{ न. पा. १६० वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेले संगमनेर आता पुढील विकास टप्प्याकडे }

नगराध्यक्ष नगरसेवकाचा दिमाखदार पदग्रहन सोहळा 

 संगमनेर ( राजगृह भारत रेघाटे ) 

संगमनेर नगरपालिकेला तब्बल १६० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली असून, ही परंपरा जपत आता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक आणि दूरदृष्टीपूर्ण पावले उचलण्याची गरज आहे. नगरपालिकेतील ऐतिहासिक विजय हा केवळ एखाद्या व्यक्तीचा नसून, तो जनतेचे प्रेम, विश्वास आणि साथीचा विजय असल्याचेही स्पष्ट करत विजय जितका मोठा, तितकी जबाबदारीही मोठी. या विजयाचे खरे भागीदार नागरिक आणि मतदार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री तथा कांग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर नगरपालिकेत सेवा समितीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक असा विजय झाल्यानंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या पदग्रहण प्रसंगी थोरात बोलत होते. थोरात म्हणाले की, मोठ्या विजयाबरोबरच मोठी जबाबदारी येते. जनतेने दाखवलेला विश्वास टिकवणे आणि प्रत्येक नागरिकाला आपले काम प्रामाणिकपणे होत आहे अशी भावना निर्माण करणे, हीच खरी कसोटी आहे.

लोकशाहीत विरोधकांचाही सन्मान महत्त्वाचा असतो.

विरोधी पक्ष हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असून, विरोध करतानाही सचोटी आणि जबाबदारी आवश्यक आहे. विरोधकांचा सन्मान राखणे हीच लोकशाहीची संस्कृती असल्याचे थोरात यांनी अधोरेखित केले. राज्यातील धुमाकुळावर चिंता व्यक्त करताना राज्यात विविध ठिकाणी घडणाऱ्या हिंसक व बेशिस्त घटनांबाबत थोरात यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. अशा घटनांमुळे महाराष्ट्र कुठल्या दिशेने चालला आहे, यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली असल्याचे सांगत, संगमनेरमध्ये असे प्रकार कदापिही होऊ दिले जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमली पदार्थ आणि हिंसाचाराला संगमनेरमध्ये थारा नाही, अशी ठाम भूमिकाच यावेळी त्यांनी मांडली. माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिके मार्फत अनेक चांगली कामे झाली असून, उर्वरित विकासकामे अधिक गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या सहभागाशिवाय विकास अशक्य असल्याचे सांगून

----- Advertisements -----

नगरपालिका, प्रशासन आणि नागरिक यांचे समन्वयित सहकार्य असल्या शिवाय शहराचा विकास शक्य नसल्याचे सांगत, संगमनेर स्वच्छ, सुंदर आणि सुखी शहर करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. संगमनेर खरी ओळख म्हणजे शहरातील हॅपी हायवे, स्वच्छता आणि बंधुभावाची आहे. शहरातून जाणारा नाशिक हायवे ‘हॅपी हायवे’ म्हणून ओळखला जातो. स्वच्छता, शिस्त आणि बंधुभाव ही संगमनेरची ओळख असून, शहर, तालुका, उद्योग आणि अर्थव्यवस्था यांचा अतूट संबंध असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

कठीण काळात महिलांना मदतीची नितांत आवश्यकता :- क्लॉडिया नोल्टे

सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री; शिक्षणातील अतुलनीय योगदानाचा गौरव करत, शिक्षण, दूरदृष्टी आणि काम करण्याची जिद्द यामुळेच समाजाची खरी प्रगती होते, असे जर्मनीच्या माजी खासदार क्लॉडिया नोल्टे यांनी सांगितले. महिला नगराध्यक्ष होणे ही अभिमानाची बाब असून, नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. थोर महान विभूतींना त्यांनी अभिवादन केले. 

जनसेवा प्रत्यक्ष कृतीत उतरत शहर विकासास कटिबध्द– नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे

जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या की, ज्ञान आणि स्वाभिमान यांच्या बळावर स्त्री स्वत:चे आणि संपूर्ण शहराचे भवितव्य घडवू शकते. प्रत्येक नागरिकाची अडचण हीच आपली अडचण समजून, कोणताही भेदभाव न करता सर्व जनता आणि नगरसेवकांना विश्वासात आणि सोबत घेऊन संगमनेर 2. 0 ही विकास संकल्पना प्रत्यक्षात साकार करू असा विश्वास त्यांनी दिला.

----- Advertisements -----

शहर विकासासाठी कठोर आणि आवश्यक निर्णय घ्यावेच लागतील – आमदार सत्यजीत तांबे

नगरपालिकेच्या निवडणुकीतून जनतेने दिलेल्या संधीचे सोनं करण्याचा निर्धार आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला. संगमनेर 2.0 च्या माध्यमातून १०० दिवसांनंतर शहराचे प्रगती पुस्तक जनतेसमोर मांडले जाईल. मुंबई येथील प्रजा फाउंडेशन सोबत सामंजस्य करार करून नगरसेवकांच्या कामगिरीचे वार्षिक मूल्यमापन आणि प्रभागनिहाय प्रगती पुस्तक घरपोच दिले जाईल, अशी स्पष्ट ग्वाहीच त्यांनी दिली.

नगरपालिकेची मिळकत ही सुमारे १५ कोटी असून, खर्च १६५ कोटींचा असल्याचे सांगत, स्वयंभू नगरपालिका उभारण्यासाठी उत्पन्न वाढीचे नवे मॉडेल राबवले जाईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. पार्किंगसह शहरशिस्ती साठी कठोर पण आवश्यक निर्णय घ्यावे लागतील असेही तांबे यांनी नमूद केले.

शहराच्या विकासासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक – राजेश मालपाणी

काम केले, कमाल करूया या ब्रीदवाक्याला संगमनेरकरांनी मतपेटीतून प्रचंड पाठिंबा दिला आहे. शहरासाठी काय करणार, याची स्पष्ट ब्लू प्रिंट समोर येणार असून , विकासासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. सामूहिक प्रयत्नांतून संगमनेर औद्योगिक, आर्थिक आणि विकासात्मकदृष्ट्या अधिक सक्षम होईल आणि शहराचा नावलौकिक हा संपूर्ण राज्य व देशपातळीवर वाढेल असा विश्वास उद्योगपती राजेश मालपाणी यांनी व्यक्त केला.

----- Advertisements -----

     यांची होती उपस्थिती

यावेळी परराष्टातील अतिथी जर्मनीच्या माजी खासदार क्लॉडिया नोल्टे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, उद्योजक गिरीश मालपाणी, मनीष मालपाणी, अमर कतारी, रणजितसिंग देशमुख, डॉ. जयश्री थोरात, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ता उत्कर्षा रूपवते, शिवसेना राष्टवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपमुख्याधिकारी संजय पेखळे, राजेंद्र गुंजाळ यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी सर्व नगरसेवक तसेच शहरातील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी प्रास्ताविक केले. सुविधा अरसिद्ध आणि शोभा हजारे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रमिला अभंग यांनी आभार मानले.

स्वत:ची किंमत ओळखली, तर जग जिंकल्यासारखे आहे.

संत एकनाथ