ब्रेकिंग न्यूज :
भारत

डॉ. बी. जी. डेरे कॉलेज मध्ये परिचय संमेलन; स्वागताने नवागत विद्यार्थ्यात सकारात्मक ऊर्जा ; फ्रेशर्स पार्टी कार्यक्रम उत्साहात

Blog Image
एकूण दृश्ये: 41

डॉ. बी. जी. डेरे कॉलेज मध्ये परिचय संमेलन; स्वागताने नवागत विद्यार्थ्यात सकारात्मक ऊर्जा ; फ्रेशर्स पार्टी कार्यक्रम उत्साहात 

  संगमनेर : ( भारत रेघाटे ) 

डॉ. भानुदास डेरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे बी.फार्मसी व डी.फार्मसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन व फ्रेशर्स पार्टीचा स्वागत कार्यक्रम उत्साहात पार पडला. नवप्रवेशितांना महाविद्यालयीन शैक्षणिक वातावरण, शिस्त, सुविधा व करिअर संधींची ओळख करून देणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे होते. कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश डेरे यांनी शिक्षणा सोबत मानवी मूल्ये, कर्तव्यनिष्ठा व व्यावसायिक उत्कृष्टतेचे महत्त्व अधोरेखित केले. विश्वस्त सौ. अंकिता डेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अमृतवाहिनी कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ए बी जगनर व आयुर्वेदिक कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सोनल डेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य प्रा. राहुल वामन यांनी अभ्यासक्रम, प्रयोगशाळा, संशोधन व करिअर संधींची माहिती देत जबाबदार व समाजाभिमुख व्यावसायिक घडण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अमोल सातपुते, प्रा. पूनम फरगडे, प्रा. स्नेहल म्हसे, प्रा. ऋतुजा देशमुख व प्रा. धनश्री मांडे यांनी केले. कार्यक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम