ब्रेकिंग न्यूज :
भारत

नव्या संधी घेऊन आलेले वर्ष फलदायी जावो; २०२६ नूतन वर्ष प्रत्येकाचा संकल्पपूर्ती होवो :-लोकनेते थोरात

Blog Image
एकूण दृश्ये: 28

नव्या संधी घेऊन आलेले वर्ष फलदायी जावो; २०२६ नूतन वर्ष प्रत्येकाचा संकल्पपूर्ती होवो :-लोकनेते थोरात

   संगमनेर (प्रतिनिधी)  

२०२५ भूतकाळाच्या अनुभवातून बोध घेत भविष्याची दिशा ठरते आणि प्रत्येक नवीन वर्ष नवी आशा, नवी ऊर्जा व नव्या संधी घेऊन येते. येणारे नवीन वर्ष २०२६ हे सर्वांसाठी आरोग्यदायी, आनंदमय व सुख-समृद्धीचे ठरो, तसेच प्रत्येक नागरिकाचा जीवनातील संकल्प पूर्ण व्हावा, अशा मन:पूर्वक शुभेच्छा काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा माजी महसूल व शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, भूतकाळ हा प्रत्येकाचा मार्गदर्शक असून त्याच्या अनुभवांवर भविष्याची वाटचाल ठरलेली असते. नवीन वर्षात प्रत्येकाला उत्तम आरोग्य, समाधानकारक जीवनमान लाभावे यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देणे गरजेचे आहे. मागील वर्षात घडलेल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करत, नकारात्मक अनुभवांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी सजग राहणे आवश्यक आहे.

आपले गाव, शहर, तालुका, राज्य आणि देश अधिक सक्षम व समृद्ध घडवण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक संकल्प करावा. सामाजिक बांधिलकी जपत, संविधान व लोकशाही मूल्यांचा सन्मान राखून राष्ट्रहितासाठी काम करावे. मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म असून संत व समाज सुधारकांच्या विचारांवर आधारित कार्यातून समाज प्रगत व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. येणारे वर्ष २०२६ हे सर्वांसाठी आनंददायी, यशस्वी व संकल्पपूर्तीस पोषक ठरो, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

२०२६ मध्ये सुदृढ व निरोगी समाजनिर्मितीसाठी कार्य व्हावे – मा.आ. डॉ. तांबे

आगामी नवीन वर्षात प्रत्येकाच्या हातून राष्ट्रहिताचे विधायक कार्य घडावे. विज्ञाननिष्ठ व पुरोगामी विचार आत्मसात करत युवकांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा. प्रत्येक नागरिकास उत्तम आरोग्य, आनंदी जीवन व यशाची नवी उंची गाठता यावी, यासाठी सकारात्मक संकल्प आवश्यक आहेत, अशा शुभेच्छा आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिल्या.

----- Advertisements -----

सकारात्मक कार्यातून जीवनात आनंद निर्माण व्हावा – आमदार सत्यजित तांबे

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान राखत प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार समाज व राष्ट्रासाठी योगदान द्यावे. नव्या तंत्रज्ञानासोबत नवनिर्मितीवर भर देत नवीन वर्ष २०२६ मध्ये सर्वांना उत्तम आरोग्य, समाधान व यश लाभो. सकारात्मक कार्यातून प्रत्येकाच्या जीवनात आनंदाची अनुभूती निर्माण व्हावी, असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले.

‘स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा’ – डॉ. जयश्री थोरात

धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असले तरी, आनंदी व समाधानी आयुष्यासाठी आरोग्य हाच खरा पाया आहे. येणाऱ्या वर्षात प्रत्येकाला आरोग्यसमृद्ध जीवन लाभो, युवकांच्या हातून लोकशाही मूल्यांवर आधारित रचनात्मक कार्य उभे राहो, अशी अपेक्षा व्यक्त करत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक व आरोग्यदायी शुभेच्छा देत संदेश दिला “स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा!”

----- Advertisements -----

शांतीसाठी संघर्ष करा, पण संघर्ष शांततेसाठीच असावा.

स्वामी विवेकानंद