ब्रेकिंग न्यूज :
भारत

सिद्धार्थ नाईट हायस्कूलच्या गरजू आणि उपेक्षित सर्व विद्यार्थ्यांना 21 अपेक्षित संचाचे वितरण

Blog Image
एकूण दृश्ये: 157

सिद्धार्थ नाईट हायस्कूलच्या गरजू आणि उपेक्षित सर्व विद्यार्थ्यांना 21 अपेक्षित संचाचे वितरण 

संगमनेर - प्रतिनिधी

माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्याअथक प्रयत्नातून बहुजन शिक्षण संघ संस्थेची स्थापना सन 1948 मध्ये झाली आणि त्याच संस्थेचे 1970 मध्ये संगमनेर आणि अकोले परिसरातील गरजू आणि दिवसा कष्टाची कामे करून रात्री शिक्षणाची व्यवस्था निर्माण करून देण्यासाठी सिद्धार्थ नाईट हायस्कूल ,संगमनेर या ठिकाणी सुरू झाले. या विद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या सर्व उपेक्षित आणि गरजू विद्यार्थ्यांना मुंबई येथील रात्र शाळांची जीवनवहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या मासूम या सामाजिक संस्थेमार्फत इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी /मार्च - 2026 मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना 21 अपेक्षित संचाचे वाटप संस्थेचे विश्वस्त मा. एम. डी. सोनवणे सर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. विकास जगताप सर आणि इतर सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांचे उपस्थितीत वितरित करण्यात आले.

याप्रसंगी बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त मा.एम. डी. सोनवणे सर यांनी प्रथमता 20 डिसेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या विचारांस आणि स्मृतीस अभिवादन करून विद्यार्थ्यांना गाडगे महाराजांचे कार्य विशद केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना रात्र शाळेत शिकणारे विद्यार्थी हे दिवसभर अत्यंत कष्टाची कामे करून रात्री शिक्षणाची भूक भागवत असतात.विविध प्रकारची कष्ट करत असतात. परंतु तुमचे हे कष्ट निश्चितच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातील याची मला खात्री आहे.

----- Advertisements -----

मासूम संस्थेच्या या योगदानाबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी या सर्व मदतीचा उपयोग जास्तीत जास्त आपल्या शिक्षणातील प्रश्न सोडविण्यासाठी संधी म्हणून उपयोग करावा असे सांगितले. सिद्धार्थ नाईट हायस्कूल येथील अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादित केलेले आहे. तुम्ही देखील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन कराल असा आशावाद व्यक्त केला. यापूर्वी सिद्धार्थ नाईट हायस्कूलचा पुणे बोर्डात इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये 100% निकाल लागलेला आहे आणि यावर्षी पुन्हा एकदा तुम्हा विद्यार्थ्यांच्या कष्टातून तो लागेल असे .स्पष्ट केले. .तसेच येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद्देश विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. विकास जगताप सर यांनी विशद करताना सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने मार्गदर्शन केले. त्यानंतर मासूम या सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना विविध गोष्टी ज्यामध्ये पुस्तके , वह्या ,21 अपेक्षित संच , शालेय वस्तू इत्यादी दिले जातात. त्यामुळे मासूम या संस्थेचे मनापासून आभार व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा जास्तीत जास्त गुणांनी पास होण्यासाठी प्रयत्न करायला हवा असे सांगितले. प्रत्येक वर्षी मासूम संस्थेकडून अशा विविध उपक्रमांचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थी आणि शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध मार्गाने प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी मासूम संस्थेच्या संचालिका मा. निकिता केतकर , मा. शशिकांत गवस सर ,मा. कमलाकर माने ,मा. गुरुप्रसाद पाटील सर , मा. निलेश ठोंबरे सर , मा.संदीप शेलार सर या सर्वांचा नामोल्लेख करून सर्व मासूम संस्था पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

----- Advertisements -----

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवार डी.बी. यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

आपण जे विचार करतो, ते आपण होतो.

भगवद्गीता
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin