ब्रेकिंग न्यूज :
भारत

संगमनेरच्या विकासाला गती ; दळणवळणास मिळणार चालना ; ५१ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ ; पालकमंत्री विखे पाटील, आमदार खताळ हस्ते २७ ला लोकार्पण

Blog Image
एकूण दृश्ये: 169

संगमनेरच्या विकासाला गती ; दळणवळणास मिळणार चालना ; ५१ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ ; पालकमंत्री विखे पाटील, आमदार खताळ हस्ते २७ ला लोकार्पण 

  संगमनेर प्रतिनिधी

संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या सुमारे ५१ कोटी ३९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण शनिवार, दि. २७ रोजी राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १० ऩंतर तालुक्यातील विविध गावांमध्ये कार्यक्रम सुरू होणार असून सायंकाळी पिंपरणे येथे जाहीर सभेने या दौऱ्याची सांगता होणार आहे.

जिल्हा नियोजन समिती तसेच आमदार निधीतून मंजूर झालेल्या या विकासकामांत निळवंडे, तळेगाव, मालदाड, गुंजाळवाडी, वडगाव लांडगा, धांदरफळ खुर्द, चंदनापुरी, हिवरगाव पावसा व पिंपरणे या गावांचा समावेश आहे. यामध्ये रस्ते, पूल, कालवे, कृषी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजनांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे.

      उर्ध्व प्रवरा (निळवंडे) प्रकल्पाच्या डाव्या कालव्या वरील मुख्य रस्ता पुलाचे बांधकाम तसेच निळवंडे डाव्या कालव्यावरील निमगाव भोजापूर, सायखिंडी, वेल्हाळे, घुलेवाडी, खांजापूर, कुरण व तळेगाव येथे १० लोखंडी पुलांचे लोकार्पण ,४ कोटी ५८ लाख रुपये होणार आहे. तळेगाव येथे १ कोटी ६० लाख, मालदाड येथे विविध विकासकामे व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे १७ कोटी २९ लाख, गुंजाळवाडी येथे १ कोटी ९० लाख, वडगाव लांडगा येथे ५ कोटी २१ लाख, धांदरफळ खुर्द येथे विविध विकासकामे व कृषी विभागाच्या योजनांचे १ कोटी ३८ लाख, चंदनापुरी येथे ३ कोटी ८१ लाख, हिवरगाव पावसा येथे ५ कोटी ८ लाख तसेच पिंपरणे पिंपळनेर कोळवाडे रस्त्याचे १० कोटी ६४ लाख रुपयांचे काम यामध्ये समाविष्ट आहे.

      याशिवाय मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत मिर्झापूर धांदरफळ खुर्द रस्त्यासाठी ६ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. या विकासकामांमुळे तालुक्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत होणार असून शेती, व्यापार व ग्रामीण जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संगमनेर तालुका महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना अनुदान वितरण, धांदरफळ खुर्द येथे होणाऱ्या कार्यक्रमात कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ३३ लाभार्थ्यांना ३५ लाख २५ हजार रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत ८ लाभार्थ्यांना १६ लाख रुपये, तसेच एमआयडीएच अंतर्गत हरितगृह व शेडनेट योजनेत १४ लाभार्थ्यांना १ कोटी ५३ लाख रुपयांचे अनुदान पालकमंत्री व आमदारांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.

----- Advertisements -----

सुखाचे रहस्य समाधानात आहे.

संत ज्ञानेश्वर