ब्रेकिंग न्यूज :
भारत

प्रजासत्ताकदिनी राजपथावर सहभागी होणाऱ्या एनसीसी पीएम सायकल रॅलीचे होणार स्वागत

Blog Image
एकूण दृश्ये: 43

प्रजासत्ताकदिनी राजपथावर सहभागी होणाऱ्या एनसीसी पीएम सायकल रॅलीचे होणार स्वागत

      संगमनेर ( प्रतिनिधी ) 

एनसीसी पंतप्रधान रॅली २०२६ च्या पार्श्वभूमीवर एनसीसी संचालनालय महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे ते दिल्ली अशी भव्य सायकल मोहीम आयोजित करण्यात आली आहे. ‘शौर्य के कदम, क्रांती की ओर’ या घोषवाक्याखाली राबविण्यात येणारी ही मोहीम युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, शौर्य आणि देशसेवेची प्रेरणा निर्माण करणारी ठरणार आहे.

       दरम्यान, ही सायकल रॅली गुरुवार दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी संगमनेर महाविद्यालयात दाखल होणार आहे. या निमित्ताने ५७ महाराष्ट्र बटालियन, अहिल्यानगर आणि संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

     या कार्यक्रमात एनसीसी कॅडेट्सच्या साहस, शिस्त व राष्ट्रसेवेच्या भावनेचा गौरव करण्यात येणार असून, वीरनारींचा विशेष सन्मानही केला जाणार आहे. या मोहिमेत सहभागी कॅडेट्स सुमारे १,६८० किलोमीटरचे अंतर पाच राज्यांतून पार करणार असून, वाटेत विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार आहेत. 

     इ.स. १७३६ मध्ये पेशवा बाजीराव प्रथम यांनी दिल्लीवर केलेल्या ऐतिहासिक स्वारीच्या मार्गावर आधारित ही सायकल रॅली शनिवार वाडा, पुणे येथून प्रारंभ होणार असून, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राजपथावरील संचलनात सहभागी होणार आहे

----- Advertisements -----

             राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि भारतीय लष्करी इतिहासाचे महत्त्व जनमानसात पोहोचविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.या स्वागत समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य प्रो. डॉ. रवींद्र ताशिलदार, उपप्राचार्य प्रो. डॉ. प्रवीण त्र्यंबके, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट प्रो. डॉ. नरेंद्र फटांगरे, लेफ्टनंट प्रो. हेमलता तारे, संतोष फापाळे यांनी केले आहे. विद्यार्थी, माजी विद्यार्थी, नागरिक व एनसीसीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आहे.

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद