ब्रेकिंग न्यूज :
भारत

मध्यरात्री पोलिसांची धाड; पानोडीत वाळू माफियांचा खेळ खल्लास ; टेम्पोसह ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

Blog Image
एकूण दृश्ये: 173

मध्यरात्री पोलिसांची धाड; पानोडीत वाळू माफियांचा खेळ खल्लास ; टेम्पोसह ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

      संगमनेर ( प्रतिनिधी ) 

पानोडी शिवारात मध्यरात्री पोलिसांनी टाकलेला सापळा वाळू माफियांना चांगलाच महागात पडला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टाटा पिकअप टेम्पवर थेट धाड टाकत पकडले. या धडक कारवाईत ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक मैदानात उतरले. दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी हद्दीत संशयास्पद टेम्पो अडवण्यात आला. चालक ऋषिकेश कारभारी बर्गे (२८, रा. कनोली) याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. टेम्पोमध्ये प्रवरा नदीपात्रातून उचललेली १ ब्रास अवैध वाळू आढळून आली. पोलिसांनी तत्काळ १० हजारांची वाळू व ३ लाखांचा टाटा पिकअप टेम्पो जप्त केला. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. या अचानक धाडीमुळे संगमनेर तालुक्यातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या कारवाईने अवैध वाळू वाहतुकीचा डाव फसला आहे.

संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराज
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin