ब्रेकिंग न्यूज :
भारत

अवघ्या काही तासात ३१ उमेदवार सत्तेच्या सिंहासनावर; उमेदवारांचे भवितव्य उलगडणार आज ; नगराध्यक्षपदाची लढत चुरशीची, सरासरी ७२ टक्के मतदान ; मतमोजणीसाठी जय्यत तयारी

Blog Image
एकूण दृश्ये: 139

अवघ्या काही तासात ३१ उमेदवार सत्तेच्या सिंहासनावर; उमेदवारांचे भवितव्य उलगडणार आज ; नगराध्यक्षपदाची लढत चुरशीची, सरासरी ७२ टक्के मतदान ; मतमोजणीसाठी जय्यत तयारी 

    संगमनेर ( भारत रेघाटे)

     संगमनेर नगर परिषदेच्या २०२५ च्या निवडणुकीत शहराच्या राजकारणाचे तापमान चांगलेच वाढले असून, तब्बल १११ उमेदवारांनी या निवडणूक रणसंग्रामात आपले नशीब आजमावले आहे. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांची मोठी संख्या असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे.

    या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार मैदानात उतरले होते. त्यामध्ये नगरसेवक पदासाठी संगमनेर सेवा समितीचे ३०, शिवसेना ( शिंदे पक्ष ) १४, भाजप १०, भाजप सहयोगी अपक्ष २, राष्ट्रवादी काँग्रेस ९, तर इतर अपक्ष तब्बल ४५ उमेदवारांचा समावेश आहे. एकूणच सर्व पक्षांनी आणि अपक्षांनी मोठ्या ताकदीने निवडणुकीत सहभाग घेतला.

        नगराध्यक्षपदासाठी मात्र खरी लढत संगमनेर सेवा समितीच्या डॉ. मैथिली तांबे आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या सुवर्णा खताळ यांच्यात रंगली असून, दोघींमधील थेट सामना शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. तर काही भागात पक्षाने दिलेल्या विश्वास आणि चिन्हावर प्रतिस्पर्धी म्हणून जोरकस लढत दिली. तर काही भागात अपक्ष उमेदवारांना पक्षीय उमेदवारापेक्षा आपली ताकद दाखवली.

      शहरातील १५ प्रभागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. मात्र प्रभाग क्रमांक १, २ आणि १५-ब येथे उमेदवारी अर्जांवर अपील झाल्याने या तीन प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या अखेर शनिवार, २० डिसेंबर रोजी या तिन्ही प्रभागात मतदान शांततेत पार पडले. यावेळी ९ उमेदवार रिंगणात होते, ११,४२६ एवढे मतदाना पैकी ८,१९१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात एकूण ५७,७१४ मतदारांपैकी ४१,९८८ मतदारांनी मतदान केले असून, सुमारे ७२.७५ टक्के मतदान झाले. २० डिसेंबर रोजीच्या मतदानात सकाळी ९.३० वाजेपर्यंत ८ टक्के, ११.३० वाजेपर्यंत २२ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत ४० टक्के, ३.३० वाजेपर्यंत ५८ टक्के आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७१.६८ टक्के मतदानाची नोंद झाली.

----- Advertisements -----

        संगमनेर शहरात ५७,७१४ मतदारांपैकी ५०,१७९ मतदारांनी आपला हक्क बजावला. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे तहसीलदार धीरज मांजरे तथा निवडणूक निर्णय अधिकारी नपाचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली.

      निवडणूकीतील काही बारकावे आणि आडाख्यानुसार संगमनेर सेवा समितीचे २१ नगरसेवक व नगराध्यक्षपदाचा १ उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना शिंदे पक्ष आणि भाजपचे मिळून ५ ते ६ उमेदवार, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा १ व २ ते ३ अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संगमनेर नगरपालिकेच्या सत्तास्थापने बाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

       शिवसेना शिंदे पक्ष आणि भाजपने आमचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडून येणार असून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा दावा समर्थकांनी केला आहे.  निवडणुकीचा अंतिम निकाल रविवार २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. निकालानंतरच संगमनेर नगरपालिकेवरील सत्तेचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

----- Advertisements -----

कठीण काळातही आत्मविश्वास ठेवा.

महात्मा गांधी