
येथील बहुजन शिक्षण संघाचे सिद्धार्थ नाइट हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास जगताप यांची समाजाभिमुख कार्याची दखल घेत, सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करून गौरव करण्यात आला. लोणी येथे झालेल्या भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास महामंडलेश्वर दत्तात्रय दहीवाळ महाराज, धनश्री विखे पाटील, शंकर अदानी, उद्योजक अजय नागरे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा सारिका नागरे व प्रदेशाध्यक्ष संदीप मानकर ,जिल्हाध्यक्ष स्वाती मुंडलिक आणि इतर यांच्या हस्ते विकास जगताप यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले. संविधानातील समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी ते सातत्याने काम करीत असल्याची उच्चउच्च पातळीवरून दखल घेत संस्थेतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आल्याचे गौरवपत्रात नमूद करण्यात आले आहे.

सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जगताप यांच्या समाजकार्य, शिक्षण क्षेत्रातील सक्रिय सहभाग आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे कौतुक करणारा ठरला आहे. समाजोन्नतीसाठी झटणाऱ्यां विविध क्षेत्रातील 51 मान्यवरांना सुवर्ण भरारी संस्थेचा सन्मान लोणी येथे दिगंबर चॅरिटेबल ट्रस्ट आणि सुवर्ण भरारी संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात समाजकार्य, शिक्षण, आरोग्य व विविध क्षेत्रांत कार्यरत 51 व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना धनश्री विखे पाटील म्हणाल्या, नावासाठी नव्हे, तर समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा त्यांना नवा आत्मविश्वास देणारा असतो. समाजासाठी झटणाऱ्यांना पुढे आणणे आणि त्यांच्या कार्याची दखल घेणे हे सुवर्ण भरारी संस्थेचे ध्येय आहे. त्या पुढे म्हणाल्या की, सामाजिक कार्य ही एकट्या व्यक्तीची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाने एकत्र येऊन हातभार लावणे आवश्यक आहे. समाजाचे देणे समाजालाच परत करण्याचा संस्थेचा हेतू पुढील पिढी घडवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.

पुरस्कार्थी मुख्याध्यापक विकास जगताप सरांचे विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि बहुजन शिक्षण संघ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त ॲड. संघराज रुपवते , अध्यक्ष बी. आर. कदम, सचिव मिलिंद गायकवाड , वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या आणि विश्वस्त उत्कर्षाताई रुपवते , विश्वस्त एम. डी. सोनवणे, आदींसह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.
संत तुकाराम